Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ता. ४ मार्च व महिला उमेदवारांना ता. ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 05:20 PM
Candidates who were absent from Hingoli Police Recruitment get another chance

Candidates who were absent from Hingoli Police Recruitment get another chance

Follow Us
Close
Follow Us:

Hingoli News : हिंगोली : हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या भरतीमध्ये (Maharashtra Police) ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ता. ४ मार्च व महिला उमेदवारांना ता. ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकूण ६४ पदासाठी भरती प्रक्रिया ता. ११ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली आहे. (Hingoli News)

याभरतीमध्ये शिपाई पदाच्या ३७ तर चालक पदाच्या २७ जागांचा समावेश असून यासाठी तब्बल १३ हजार २०० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यानुसार संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, त्यानंतर शारिरीक चाचणी – झाल्यानंतर त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेत अध्यपिक्षा अधिक उमेदवार गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.

हे देखील वाचा : तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

उमेदवारांना अखेरची संधी

सदर उमेदवार काही अडवणीमुळे भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकले नसल्याचे गृहीत धरून कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ नये यादृष्टीकोनातून त्यांना एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षका डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे. त्यानुसार या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल केले आहे मात्र काही अडचणीमुळे शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलेले उमेदवार हजर राह शकले नाही त्या उमेदवारापैकी पुरुष उमेदवारांना ता. ४ मार्च रोजी व महिला उमेदवारांसाठी ता. मार्च रोजी सकाळी साडेचार वाजता संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेसाठी हजन राहता येणार आहे. उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असून अडचणीमुळे गैरहजर असलेल्या उमेदवारांनी यावेळी हजर रहण्याचे आवाहन पोलिस अधिक्षका डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

हे देखील वाचा : आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

 

देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

सेनगाव (वा.) हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधारवाडी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार अड्डधावर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, प्रवीण नगर भागातील महादेव मंदिराजवळील एका घरात अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६:२५ वाजता पोलिसांनी बनावट
ग्राहक पाठवून सापळा रचला आणि त्यानंतर छापा टाकला. तपासणीदरम्यान संबंधित महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून मुली व महिलांना बोलावून देहविक्री व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी दिलीपराव वग्गे यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस निरीक्षक शाम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Web Title: Candidates who were absent from hingoli police recruitment get another chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Maharashtra Police
  • Police Recruitment

संबंधित बातम्या

महिला सक्षमीकरणावर उमटले प्रश्नचिन्ह? महिला नगरसेविकांच्या खुर्च्यांवर पुरुषराज! पती, पिता किंवा पुत्राने घेतला कारभार हाती
1

महिला सक्षमीकरणावर उमटले प्रश्नचिन्ह? महिला नगरसेविकांच्या खुर्च्यांवर पुरुषराज! पती, पिता किंवा पुत्राने घेतला कारभार हाती

Hingoli News : ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा आदेश केवळ कागदावरच; ग्रंथपालांचे वेतन मजुरापेक्षाही कमी
2

Hingoli News : ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा आदेश केवळ कागदावरच; ग्रंथपालांचे वेतन मजुरापेक्षाही कमी

Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश
3

Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.