कुडाळमध्ये तिहेरी अपघात (फोटो- aigemini)
कुडाळ-मालवण मार्गावर तिहेरी अपघात
स्कूटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू
अपघातग्रस्त स्कूटीला ठोकर बसल्याने दुचाकीस्वर जखमी
कुडाळ: कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला.
यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या स्कुटीवरील स्वार निलम निलेश मेस्त्री (वय ३५, रा. नेरूर साईटेंब, ता. कुडाळ) यांनी अचानक ब्रेक लावला. त्यात त्या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी (वय २४, रा. रोयुडीयेवाडी, नेरुर तर्फ हवेली देऊळवाडा, ता. कुडाळ) हे किरकोळ जखमी झाले.
Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…
त्याच्या डाव्या हातास व कंबरेला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५. रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याला ताब्यात घेतले, ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी जखमी मोटारसायकलस्वार मुकुंद मार्गी यांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दिली. पुढील तपास कुडाळ पोलिस करत आहेत.
Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील रावतळे-विंध्यवासिनी रस्त्यानजिक गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा दुचाकीस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतले. दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गान जात होती. रस्त्यावर पडलेल्य साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळस घालून पुढे न्यावे लागले.






