दुबईमध्ये अडकले महाराष्ट्रातील पर्यटकांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळामध्ये दिली (फोटो - सोशल मीडिया)
सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांबाबत माहिती दिली आहे. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत या ठिकाणी मागच्या काही दिवसात इराणने हल्ले केले आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय अडकले आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले की, “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरु केले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांना माहिती आहे की एअर इंडियाची विमानं हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरु आहेत. जिथून आणणं शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत. कुवैतमध्ये समस्या आलेली, काही ट्रान्झिट पॅसेंजर आहेत. त्यांच्या व्हिसाच्या अडचणी होत्या. एम्बीसने प्रयत्न करुन त्यांना एका ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यांना अडचण येणार नाही असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळामध्ये दिली आहे.
हे देखील वाचा : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत
“परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळं आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करतोय. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले आहेत. आपले चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते फॉरेन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी एंबसीची बैठक घेतली. ज्या एसओपी आहेत, त्या नागरिकांना दिल्या आहेत. लोकांनी काय काय करायचं आणि काय करु नये हे पोहोचवलं आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून जी मदत करणं शक्य आहे ती करत आहोत. मिहिर कोटेचा यांनी दुबईत अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.,” असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.






