Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी याने सीबीएसई आणि आयआयटीच्या सायबर टीमसोबत काम करण्याचे निमंत्रण मिळाल्याचा मोठा दावा केला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 12:07 PM
cbsc

cbsc

Follow Us
Follow Us:

CBSE Cyber Security: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सायबर सुरक्षा प्रकरणत आता नवे वळण आले आहे. १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी याने असा दावा केला आहे की, सीबीएसईने त्याला आपल्या आयटी सिस्टीममधील सुरक्षेच्या त्रुटी शोधण्यासाठी आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी आयआयटीच्या सायबर तज्ञाच्या टीमसोबत काम करण्याचे निमंत्रण दिले आहे.

तसेच त्याने एका माध्यम समूहासमोर बोलताना सांगितले की, यासंदर्भात त्यांच्याशी टेक्स्ट मेसेज आणि ईमेल या दोन्ही माध्यमातून संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला आयआयटीच्या सायबर सुरक्षा टीममध्ये इंजिनिअर म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

मंडळाकडून (बोर्डाकडून) अजून तरी अधिकृत दुजोरा नाही

परंतु, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या हा दावा निसर्ग अधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. निसर्ग अधिकारी हे तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी सीबीएसीच्या विद्यार्थ्यांच्या डेटाशी संबंधित एका पोर्टलमधील सुरक्षेच्या त्रुटींच्या माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत या डेटाची सायबर टीमने याची तपासणी केली आहे.

NEET Re-Exam 2026: पेपर लीक प्रकरणातील आरोपीला परीक्षेला बसण्याची परवानगी का मिळाली? काय आहे कोर्टाचा निर्णय?

आयआयटीची टीम करत आहे हे काम

अहवालानुसार, आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरच्या तज्ञांच्या टीमने सुमारे दोन आठवडे सीबीएसईच्या मुख्य कार्यालयात राहून विविध पोर्टलच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणि तांत्रिक रचनेचे पुनरावलोकन केले. या दरम्यान सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि सिस्टीमला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले. या सुधारणांनंतर सीबीएसईचे री-इव्हॅल्युएशन पोर्टल २ जून रोजी अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १३ लाख लॉगिनचे प्रयत्न नोंदवले गेले. तर ३ जून रोजी ही संख्या ३० लाखांहून अधिक झाली. परंतु, यावर सायबर टीमने यावर वेळेवर नियंत्रण मिळवले.

Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?

सीबीएसईच्या टीमला मदत

सीबीएसईची इन हाऊस डेव्हलपर टीम सात्यत्याने सिस्टीमवर काम करत होती. परंतु, त्यांना पुरेशा तांत्रिक मार्गदर्शनाची आणि तज्ञांच्या मदतीची आवश्यकता होती. याच कारणामुळे बाहेरील तज्ञांना विशेषत: आयआयटी संस्थांच्या टीम्सना या प्रक्रियेत सामील करून घेण्यात आले. तसेच आता तांत्रिक मूल्यांकनासाठी आयआयटीच्या तज्ञांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: Cbse cyber security ethical hacker nisarga adhikari iit team claim marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • CBSE
  • Cyber Attack
  • Cyber security

संबंधित बातम्या

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती
1

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

हॅकर्सचा डार्क वेबवर दावा! भारताच्या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाच्या गुपिते लीक; रिलायन्सने दिली सायबर हल्ल्याची कबुली
2

हॅकर्सचा डार्क वेबवर दावा! भारताच्या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाच्या गुपिते लीक; रिलायन्सने दिली सायबर हल्ल्याची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.