Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE History: सीबीएसई बोर्ड अस्तित्वात येण्यापूर्वी देशात परीक्षा कशी व्हायची? जाणून घ्या रंजक इतिहास…

CBSE History: सध्या देशभरात सीबीएसई (CBSE) बोर्डाची मोठी चर्चा आहे. परंतु, स्वातंत्र्यापूर्वी आणि या केंद्रीय मंडळाच्या स्थापनेपूर्वी भारतात बोर्ड परीक्षा नेमक्या कशा आयोजित केल्या जायच्या? वर्ष १९२१ मध्ये स्थापन झालेल्या देशातील पहिल्या बोर्डाचे कार्यक्षेत्र किती मोठे होते?जाणून घ्या सविस्तर ...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 10:12 AM
cbsc

cbsc

Follow Us
Follow Us:

History of CBSE Board: अलीकडे सीबीएसई बोर्डची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, सीबीएसई बनण्यापूर्वी देशात बोर्ड परीक्षा कशा आयोजित केल्या जात होत्या. तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोण करायचे? आणि शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे काम करायची? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर..

वास्तविक पाहता सीबीएसईच्या (CBSE) स्थापनेपूर्वी शालेय शिक्षण आणि बोर्ड परीक्षांची जबाबदारी वेगवेगळ्या प्रांतीय विद्यापीठाकडे तसेच प्रादेशिक शिक्षण मंडळाकडे होती. त्या काळात आपल्या देशात कोणतेही केंद्रीय शिक्षण मंडळ नव्हते. प्रत्येक प्रांत किंवा क्षेत्र आपल्या शिक्षण व्यवस्थेनुसार परीक्षा आयोजित करत होते.

देशातील पहिले बोर्ड कधी बनले?

आपल्या देशात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर परीक्षा पद्धतशीरपणे चालवण्यासाठी राज्यस्तरावर बोर्ड स्थापन केले होते. १९२१ मध्ये ‘यूपी बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमीडिएट एज्युकेशन’ (UP Board) असे उत्तर प्रदेशातील पहिल्या बोर्डाचे नाव होते. त्या काळात यूपी बोर्डाचे कार्यक्षेत्र मोठे होते आणि ते अनेक भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करायचे.

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…
त्यानंतर शिक्षणाच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन १९२९ मध्ये बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमीडिएट एज्युकेशन, राजपुतानाची स्थापना केली. हे बोर्ड तत्कालीन राजपुताना अजमेर, मेरवाड, मध्य-भारत आणि ग्वाल्हेर यांसारख्या भागातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले होते.

सीबीएसई (CBSE History) कधी अस्तित्वात आले?

सीबीएसई बोर्डाच्या स्थापनेची गोष्टही रंजरक आहे, १९२९ मध्ये बनलेल्या या बोर्डाचा स्वातंत्र्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणे आणि राष्ट्रीय गरजांनुसार विकास करण्यात आला. शेवटी १९५२ मध्ये याचे नाव बदलून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई करण्यात आले. या बोर्डासोबतच केंद्रीय संस्थेची सुरुवात होऊन माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली. जी राष्ट्रीय पातळीवर माध्यमिक शिक्षणाला दिशा देऊ लागली.

NEET Paper Leak: २० लाखांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश? अहमदाबादच्या तरुणाने रेकॉर्डिंगसह केला खळबळजनक खुलासा
परंतु, सीबीएसईला खरी ओळख राष्ट्रीय स्तरावर १९६२ मध्ये मिळू लागली. त्या काळात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये सातत्याने बदली होत असे, अशा स्थितीत मुलांच्या शिक्षणावर परीणाम होऊ नये, म्हणून एकसमान अभ्यासक्रम आणि परिक्षा प्रणालीची गरज भासू लागली तसेच त्या काळातील परीक्षा व्यवस्था आजच्या तुलनेत खूपच मर्यादित होती.

Web Title: Cbse history indian education system before independence up board origin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • CBSC
  • CBSE
  • History

संबंधित बातम्या

CBSE 12 वीच्या सप्लीमेंट्री उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत आणि फेर-तपासणीसाठी अर्ज कधी व कसा करावा? जाणून घ्या
1

CBSE 12 वीच्या सप्लीमेंट्री उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत आणि फेर-तपासणीसाठी अर्ज कधी व कसा करावा? जाणून घ्या

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!
2

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.