Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांनो All The Best! उद्यापासून सुरू होणार ‘ही’ महत्वाची परीक्षा; तब्बल 17 लाख…

एमपीएड अभ्यासक्रमासाठी यंदा २५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये १७८० पुरुष व ७४५ महिलांचा समावेश आहे. याशिवाय १९ अनाथ विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 07:01 PM
विद्यार्थ्यांनो All The Best! उद्यापासून सुरू होणार ‘ही’ महत्वाची परीक्षा; तब्बल 17 लाख…
Follow Us
Follow Us:

उद्यापासून सीईटी प्रवेश परीक्षांना सुरुवात होणार
एकूण १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा 
महाराष्ट्रातील १८ परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने परीक्षा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षांना आज, २४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेचा प्रारंभ पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (एमपीएड) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेपासून झाला आहे.
यावर्षी राज्यभरात एकूण १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा १६ मे २०२६ पर्यंत ५४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, महाराष्ट्रातील १८ परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षेसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून येत आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून सुमारे १७ लाख ६३ हजार ६५३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १२.४७ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.दरम्यान, यावर्षीपासून पीसीबी, पीसीएम आणि एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रथमच दोन संधी देण्यात आल्या आहेत. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी मिळून १३ लाख ४६ हजार १६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

एमपीएड अभ्यासक्रमासाठी यंदा २५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये १७८० पुरुष व ७४५ महिलांचा समावेश आहे. याशिवाय १९ अनाथ विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १४१ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. २५ मार्च रोजी या अभ्यासक्रमाची क्षेत्रीय चाचणी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. एकूणच, सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार….; कधी होणार परीक्षा?

प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी – 

वर्ष – एम. पी. एड.

२०२३-२४ – २०८८

२०२४-२५ – २६८६

२०२५-२६ – २३८४

२०२६-२७ -२५२५

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी!

राज्य सामाईक प्रवेश परीक्षेतर्फे घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी आणि एक अंतिम अशी दोन प्रवेश पत्रे देणार आहे.

Web Title: Cet exam start 24 march 2026 17 lakhs students career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
2

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
4

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.