Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Translator Career: भाषांची आवड आहे? मग ‘भाषांतर’ क्षेत्रात करा करिअर; मिळेल मोठी कमाई आणि जग फिरण्याची संधी!

जर तुम्हाला भाषांची आवड असेल तर ट्रान्सलेशन (Translation) क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत. जापानी, फ्रेंच, जर्मन यांसारख्या भाषा शिकून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. जाणून घ्या पात्रता आणि संस्था.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 12, 2026 | 05:07 PM
भाषांची आवड आहे? मग 'भाषांतर' क्षेत्रात करा करिअर; मिळेल मोठी कमाई (Photo Credit- AI)

भाषांची आवड आहे? मग 'भाषांतर' क्षेत्रात करा करिअर; मिळेल मोठी कमाई (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • भाषांची आवड आहे?
  • मग ‘भाषांतर’ क्षेत्रात करा करिअर
  • मिळेल मोठी कमाई आणि जग फिरण्याची संधी!
Career In Translation: जर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आवड असेल आणि विविध भाषांच्या माध्यमातून ज्ञान व संस्कृती जोडण्याची तुमची इच्छा असेल, तर ‘भाषांतर’ (Translation) हे क्षेत्र तुमच्यासाठी एक सर्वोत्तम करिअर पर्याय ठरू शकते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ट्रान्सलेशन हे केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्दांचा अनुवाद करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रभावी दळणवळण करण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे. डिजिटल मीडियाचा विस्तार आणि जागतिक बाजारपेठांमुळे सध्या व्यावसायिक भाषांतरकारांची मागणी अभूतपूर्व वाढली आहे.

ट्रान्सलेशन क्षेत्रातील स्कोप 

आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs), सरकारी संस्था, मीडिया हाऊसेस, पब्लिशिंग हाऊसेस आणि संयुक्त राष्ट्र (UN), जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रान्सलेटरची भरती केली जाते. कंटेंट मार्केटिंग आणि डिजिटल मीडियाच्या वाढत्या ट्रेंडमुळे वेबसाईट्स, ब्लॉग्स, अधिकृत कागदपत्रे आणि सोशल मीडिया कंटेंटचे वेगवेगळ्या प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. याशिवाय खालील क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ भाषांतरकारांची मोठी मागणी असते:

  • लीगल ट्रान्सलेशन: न्यायालयीन आणि कायदेशीर दस्तऐवज.
  • मेडिकल ट्रान्सलेशन: वैद्यकीय अहवाल, औषधांचे मॅन्युअल्स आणि रिसर्च पेपर्स.
  • टेक्निकल ट्रान्सलेशन: आयटी (IT) कंपन्यांचे सॉफ्टवेअर गाईड्स आणि तांत्रिक मॅन्युअल्स.

कोणत्या भाषांना मोठी मागणी आहे?

भारतात हिंदी, तमिळ आणि बंगाली यांसारख्या भारतीय भाषांमधील भाषांतरकारांची मागणी असली, तरी जागतिक स्तरावर काही विशिष्ट भाषांना खूप मागणी आहे. यामध्ये खालील भाषांचा समावेश होतो. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, चिनी (मँडरिन), जपानी, कोरियन, अरबी आणि रशियन. या भाषांवर प्रभुत्व असलेल्या भाषांतरकारांना आयटी (IT) कंपन्या, दूतावास, पर्यटन कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संधी मिळतात. विशेषतः जपानी आणि कोरियन भाषांमध्ये नैपुण्य असलेल्या भाषांतरकारांना अनेकदा आकर्षक पगाराच्या संधी मिळतात.

SBI Apprentice Recruitment 2026 : नोकरीची मोठी संधी! SBI ने अर्जाची मुदत वाढवली; 7000 पेक्षा जास्त जागा रिक्त

या क्षेत्रात ‘एक्सपर्ट’ कसे व्हावे? 

१. भाषांवर मजबूत पकड:

भाषांतराची पहिली अट म्हणजे तुमचे ‘सोर्स लँग्वेज’ (ज्या भाषेतून अनुवाद करायचा आहे) आणि ‘टार्गेट लँग्वेज’ (ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे) या दोन्हीवर उत्तम प्रभूत्व असले पाहिजे. यासाठी तुम्ही भाषा विषयांतून बीए (BA), एमए (MA) किंवा मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्स करू शकता.

२. नामांकित संस्थांमधून डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन:

भारतात अनेक आघाडीच्या केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांमध्ये ट्रान्सलेशनचे विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत:

  • जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU), दिल्ली
  • दिल्ली युनिव्हर्सिटी (DU)
  • बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU), वाराणसी
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU – इग्नू)
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस (IIFL)

३. इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकल अनुभव:

कोर्स पूर्ण करत असताना किंवा नंतर एखाद्या नामांकित ट्रान्सलेशन एजन्सीमध्ये इंटर्नशिप करा किंवा फ्रीलांस प्रोजेक्ट्सवर काम करा. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ (Portfolio) मजबूत होतो.

४. स्पेशलायझेशन निवडा

तुम्ही मेडिकल, लीगल, टेक्निकल किंवा ऑडिओ-व्हिज्युअल (चित्रपट आणि वेब सिरीजसाठी सबटायटल्स लिहिणे) यांपैकी एका क्षेत्राची निवड करून त्यात स्पेशलायझेशन केल्यास तुमची मार्केट व्हॅल्यू खूप वाढते.

पगार आणि करिअर ग्रोथ (Salary Structure & Freelancing)

ट्रान्सलेशन क्षेत्रात अनुभवासोबत पगार खूप वेगाने वाढतो:

  • शुरुवातीचा पगार (Trainee): महिना ₹२०,००० ते ₹४०,००० पर्यंत.
  • अनुभवी भाषांतरकार (Experienced): महिना ₹६०,००० ते ₹१ लाख पेक्षा जास्त.

वर्क फ्रॉम होम आणि फ्रीलांसिंगच्या संधी:

या क्षेत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘Work From Home’ (घरी बसून काम करण्याची) उत्तम सोय उपलब्ध आहे. तुम्ही स्वतंत्रपणे (Freelancer) काम करून परदेशी क्लायंट्स मिळवू शकता. यासाठी Upwork, Fiverr, ProZ, आणि Freelancer यांसारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सवर भाषांतराचे हजारो प्रोजेक्ट्स रोज उपलब्ध असतात, जिथे प्रोजेक्टच्या आणि शब्दांच्या संख्येनुसार डॉलरमध्ये कमाई करता येते.

मुंबई विद्यापीठाच्या प्रा. शिंपींचा आंतरराष्ट्रीय डंका; जगातील अव्वल 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश

Web Title: Complete career guidance in translation field eligibility salary and top institutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Career News
  • Job
  • Translate

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
2

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
4

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.