मुंबई विद्यापीठाच्या प्रा. शिंपींचा आंतरराष्ट्रीय डंका; जगातील अव्वल 5 टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरणारी कामगिरी नोंदवत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. नवीनचंद्र गोपाळ शिंपी यांचा ‘सायरँक ग्लोबल’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कारवारीत जमातीवर मारला आटक्के शास्त्रज्ञांमध्ये ‘सायरँक ग्लोबल’ ही जागतिक स्तरावरील संशोधकांचे मूल्यमापन करणारी मान्यताप्राप्त आणि स्वतंत्र संस्था असून ती संशोधन लेखांना मिळालेली उद्धरणे (सायटेशन), वैज्ञानिक प्रभाव आणि संशोधनातील योगदान यांच्या आधारे दरवर्षी जागतिक क्रमवारी जाहीर करते. जगभरातील सुमारे २ कोटी सक्रिय संशोधकांमधून ही निवड केली जाते.
प्रा. शिंपी यांचा एच-इंडेक्स ४० इतका असून, मुंबई विद्यापीठातील संशोधकांमध्ये ते सर्वाधिक प्रभावी संशोधकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. बौद्धिक संपदा निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर ३ पेटंट मंजूर झाले आहेत. ३ पेटंटसाठी अर्ज केले. अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २१ संशोधकांनी पीएच. डी. पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे.
प्रा. नवीनचंद्र शिंपी यांच्या या जागतिक यशामुळे मुंबई विद्यापीठाच्या संशोधन परंपरेला आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रतिष्ठेला नवी उंची प्राप्त झाली असून, त्यांच्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह विद्यापीठ प्रशासन, शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संशोधन नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर मिळाले स्थान
प्रा. नवीनचंद्र शिंपी यांचे संशोधन कार्य प्रामुख्याने पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी गॅस सेन्सिंग आणि डाई डिग्रेडेशन तंत्रज्ञान, सेंद्रिय रूपांतरण अभिक्रिया, औषध वितरण प्रणाली, ऊर्जा संचयन, जैवविघटनशील पॉलिमर्स आणि प्रगत कार्यक्षम पदार्थ या क्षेत्रांमध्ये केंद्रित आहे. त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षण, ऊर्जा, आरोग्य आणि शाश्वत विकास या क्षेत्रांना महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
आतापर्यंत १७५ आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित
संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांच्या अनेक संशोधन लेखांतील ग्राफिकल अॅब्स्ट्रॅक्ट्सना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे, ही संशोधन क्षेत्रातील अत्यंत मानाची बाब मानली जाते. प्रा. नवीनचंद्र शिंपी यांनी आतापर्यंत १७५ आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित केले असून त्यांचा सरासरी इम्पॅक्ट फॅक्टर ६.२ इतका आहे. त्यांच्या संशोधन कार्याला जगभरातील संशोधकांकडून मोठी दखल मिळाली आहे.






