Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CRPF vs BSF Difference: CRPF की BSF मधील नेमका फरक काय? कोणत्या जवानांना जास्त पगार मिळतो? पाहा संपूर्ण आकडेवारी

CRPF vs BSF Difference: सीआरपीएफ (CRPF) आणि बीएसएफ (BSF) या दोन्ही निमलष्करी दलांच्या जबाबदाऱ्या आणि कामात मोठा फरक आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार या जवानांना किती पगार आणि भत्ते मिळतात, सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 23, 2026 | 10:57 AM
bsf and crpf

bsf and crpf

Follow Us
Follow Us:

CRPF vs BSF Difference: भारतात लष्कर आणि पोलिसांशिवाय इतरही अनेक निमलष्करी दले आहेत, जी देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये सीआरपीएफ (CRPF) आणि बीएसएफ (BSF) यांचाही समावेश होतो. परंतु, अनेकदा लोकांना असे वाटते की ही दोन्ही दले एकच आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जरी ही दोन्ही दले केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असली, तरी त्यांच्या कामाची पद्धत आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया की या दोन्ही दलांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणाला जास्त पगार मिळतो.

सीआरपीएफ (CRPF) चे काम काय असते?

CRPF चे पूर्ण नाव ‘सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स’ (केंद्रीय राखीव पोलीस दल) असे आहे. देशाच्या अंतर्गत भागात शांतता राखणे किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत सुरक्षा पुरवणे हे सीआरपीएफचे काम असते. उदाहरणार्थ, कुठे दंगल झाली, नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला, निवडणुकांदरम्यान सुरक्षा व्यवस्था राखणे, व्हीआयपी (VIP) व्यक्तींना सुरक्षा देणे आणि कोणत्याही राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाल्यास सीआरपीएफला पाचारण केले जाते.

बीएसएफचे (BSF) नेमके काम काय असते?

BSF चे पूर्ण नाव ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ (सीमा सुरक्षा बल) असे आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे मुख्य कर्तव्य आहे. प्रामुख्याने पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या सीमांवर बीएसएफचे जवान अहोरात्र तैनात असतात. याशिवाय, घुसखोर आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही अवैध हालचालींना रोखण्याचे काम हे जवान करतात.

पगार किती असतो?

पगाराबाबतची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दोन्ही दलांतील जवानांना ७ व्या वेतन आयोगानुसार ‘पे लेव्हल-३’ अंतर्गत पगार मिळतो.

CRPF: सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबलचा मूळ पगार (बेसिक सॅलरी) सुमारे २१,७०० रुपयांपासून सुरू होतो, जो विविध भत्त्यांसह (अलाउन्स) वाढून सुमारे ६९,१०० रुपयांपर्यंत पोहोचतो. परंतु इन हँड सॅलरी २५,००० ते ३५,००० रूपयांदरम्यान मिळते.

BSF: बीएसएफमध्येही कॉन्स्टेबलचा मूळ पगार २१,७०० रुपयांपासून सुरू होऊन ६९,१०० रुपयांपर्यंत असतो. इन-हैंड पगारही साधारणपणे २३,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान असतो.

Medical Education Big Change: मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पीजी डिप्लोमा कोर्सेस बंद होणार? जाणून घ्या सविस्तर…

म्हणजेच, एकूणच या दोन्ही दलांच्या इन-हैंड पगारामध्ये फारसा फरक नसून पोस्टिंगच्या जागेनुसार यामध्ये बदल होतो. सीमावर्ती भागासारख्या (बॉर्डर एरिया) कठीण ठिकाणी तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना ‘हार्ड एरिया अलाउन्स’ (कठीण क्षेत्र भत्ता) म्हणून अतिरिक्त रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांचा एकूण पगार वाढतो.

पदोन्नती आणि इतर सुविधा

करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास, दोन्ही दलांमध्ये कॉन्स्टेबलपासून हेड कॉन्स्टेबल, एएसआय (ASI), एसआय (SI), इन्स्पेक्टर आणि त्यावरील पदांपर्यंत पदोन्नतीचे मार्ग खुले असतात. जसजशी रँक वाढते, तसतसा पगारही चांगला वाढतो. या दोन्ही दलांतील जवानांना वैद्यकीय सुविधा (Medical Facility), पेन्शन, ग्रॅच्युइटी, मोफत रेशन आणि निवासस्थान यांसारख्या सुविधाही सरकारकडून दिल्या जातात, ज्यामुळे नोकरीची सुरक्षितता अधिक मजबूत होते.

कॉलेज ड्रॉपआउट ते व्हॉट्सॲपचे ‘ग्लोबल सीईओ’! आता ‘हा’ भारतीय सांभाळणार ३ अब्ज युजर्स असलेल्या WhatsApp ची कमान!

Web Title: Crpf vs bsf difference job profile salary allowances

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • bsf jawan
  • CRPF
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
1

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
2

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
3

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
4

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.