Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Library: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! १ कोटीहून अधिक ई-बुक्स आणि हायटेक सुविधांसह नवी लायब्ररी सुरू

NDMC Udyan Marg public library infrastructure 2026: दिल्लीत एनडीएमसीद्वारे (NDMC) अत्याधुनिक जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. १ कोटीपेक्षा जास्त ई-बुक्स, मोफत वाय-फाय आणि इतर डिजिटल सुविधांविषयी वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 02:41 PM
AMIT SHAHA

AMIT SHAHA

Follow Us
Follow Us:

Delhi JP Narayan Public Library: दिल्लीतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि वाचनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये एनडीएमसीने (NDMC) उद्यान मार्ग येथे अत्याधुनिक ‘जयप्रकाश नारायण पब्लिक लायब्ररी’ (सार्वजनिक ग्रंथालय) सुरू केली असून, याचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

लायब्ररीमध्ये कोणत्या आधुनिक सुविधा मिळणार?

हे ग्रंथालय (लायब्ररी) सुमारे २,२६५ वर्गमीटर क्षेत्रात बांधण्यात आले असून, येथे एकाच वेळी अंदाजे २०० लोक बसून अभ्यास करू शकतात. या लायब्ररीमध्ये ३५ हजारांहून अधिक पुस्तके, शोधपत्रिका आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय, ई-लायब्ररीच्या (E-Library) माध्यमातून तब्बल १ कोटीपेक्षा जास्त ई-बुक्स (E-Books) वाचण्याची सुविधाही येथे मिळणार आहे.

या लायब्ररीमध्ये आधुनिक रीडिंग एरिया, रिसर्च सेंटर, मुलांसाठी स्वतंत्र ‘किड्स झोन’, मल्टिपर्पज ऑडिटोरियम, मोफत वाय-फाय आणि आरएफआयडी (RFID) आधारित बुक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे ग्रंथालय ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’शी (National Digital Library of India) देखील जोडले जाणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

उद्घाटन प्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले की, कोणत्याही देशाचे भविष्य हे शेती, बाजार किंवा उद्योगांवरून ठरत नाही, तर तिथल्या ग्रंथालयांमध्ये वाचायला येणाऱ्या तरुणांवरून ठरते. पुस्तके वाचल्याने विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे प्रत्येक तरुणाने कोणत्या ना कोणत्या ग्रंथालयाशी नक्कीच जोडले गेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, त्यांच्या शहरातील लायब्ररीचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला. लहानपणी गोष्टींची पुस्तके वाचता वाचता त्यांची आवड वेद आणि उपनिषदांपर्यंत पोहोचली. “बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे आणि विचार करण्यापूर्वी वाचन केले पाहिजे; कारण योग्य विचार हा पुस्तकांमधूनच येतो,” असे मत त्यांनी मांडले.

Government Employees: काम न करता दरमहा पूर्ण पगार! पण तरीही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक ताणाव का?

राजधानी दिल्लीतील सर्व सार्वजनिक ग्रंथालये एकमेकांशी जोडली जावीत आणि ती शाळांशीही कनेक्ट केली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, जयप्रकाश नारायण लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये येण्यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून तरुणांमध्ये वाचनाची आवड वाढेल, असेही ते म्हणाले.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, ही लायब्ररी दिल्लीतील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी भेट आहे. विशेषतः यूपीएससी (UPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे अभ्यासासाठी उत्तम वातावरण आणि आधुनिक सुविधा मिळतील. ही लायब्ररी तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

UPSC Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आई आणि भावाने शेतात घाम गाळला; सांगलीच्या ऋतुराज पाटीलची यूपीएससी परीक्षेत ‘बाजी’!

एनडीएमसीचे अध्यक्ष केशव चंद्र यांनी माहिती दिली की, हे ग्रंथालय लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. तर एनडीएमसीचे उपाध्यक्ष कुलजीत सिंह चहल म्हणाले की, हे ग्रंथालय येणाऱ्या काळात तरुणांच्या अभ्यासाचे, संशोधनाचे आणि नवीन विचारांचे एक मोठे केंद्र बनेल.

Web Title: Delhi ndmc jayaprakash narayan public library inauguration amit shah features e books

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Rekha Gupta

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.