Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pralhad Joshi: शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त पदभार; पण पगार का वाढणार नाही? जाणून घ्या नेमके कारण..

Pralhad Joshi Salary: परीक्षा गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा. प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त प्रभार, पण पगार का वाढणार नाही? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 26, 2026 | 09:24 AM
prahad joshi

prahad joshi

Follow Us
Follow Us:

Pralhad Joshi Salary: देशाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परीक्षांमधील गैरव्यवहार आणि देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्याकडे देशाच्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारूनही प्रल्हाद जोशी यांच्या पगारात एक रुपयाचीही वाढ होणार नाही.

कॅबिनेट मंत्र्याला किती मिळते वेतन?

भारतात केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ‘संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन कायद्या’ अंतर्गत ठरवले जातात.

  • मूळ वेतन: दरमहा १,००,००० रुपये.
  • मतदारसंघ भत्ता: मतदारसंघाच्या देखभालीसाठी दरमहा ७०,००० रुपये.
  • कार्यालयीन भत्ता: कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६०,००० रुपये.
  • दैनिक भत्ता: संसद अधिवेशन किंवा बैठकीत उपस्थित राहिल्यास दररोज २,००० रुपये.
या सर्व भत्त्यांनुसार एका केंद्रीय मंत्र्याचा एकूण अंदाजे मासिक पगार २.३० लाख ते २.५० लाख रुपयांच्या दरम्यान असतो. या वेतनासोबतच त्यांना लुटियंस दिल्लीत शासकीय बंगला, वाहन, चालक, मोफत विमान/रेल्वे प्रवास आणि मोफत वैद्यकीय सुविधा मिळतात.

नवीन मंत्रालय मिळाले तरी पगार का वाढणार नाही?

भारतीय संविधान आणि संसदीय नियमांनुसार ‘लाभाचे पद’ या तत्त्वाचे काटेकोर पालन केले जाते. या नियमांनुसार, कोणताही मंत्री एकाच वेळी एकाच पदाच्या वेतनास पात्र असतो.

Quantum Computing Startup: भारतात बनवले स्वतःचे क्वांटम कॉम्प्युटर; ‘या’ तीन भारतीयांची यशोगाथा एकदा वाचाच..

मंत्र्याकडे एका विभागाची जबाबदारी असो किंवा चार विभागांची, त्यांना मिळणारा पगार कॅबिनेट मंत्र्याच्या एकाच पदाचा राहतो. अतिरिक्त मंत्रालयाचा कार्यभार हा तात्कालिक ‘अतिरिक्त कार्यभार’ मानला जातो, ज्यासाठी कोणताही वेगळा पगार किंवा भत्ता देण्याची तरतूद नाही.

प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता तीन मोठ्या मंत्रालयांची धुरा

कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा (२००४ ते २०२४) विजयी झालेले प्रल्हाद जोशी हे केंद्र सरकारमधील अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेते मानले जातात. ते सध्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (ISA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

NTA Revenue: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यादरम्यान एनटीएच्या कमाईची समोर आलेली आकडेवारी पहा एका क्लिकवर..

शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यानंतर आता त्यांच्याकडे एकूण तीन महत्त्वाची मंत्रालये आली आहेत. ज्यामध्ये शिक्षण मंत्रालयच्या अतिरिक्त कार्यभारासोबत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांचा समावेश आहे.

Web Title: Dharmendra pradhan resignation pralhad joshi education ministry salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • education
  • narendra modi
  • Salary

संबंधित बातम्या

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
1

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
3

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
4

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.