Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CTET उत्तीर्ण झाला नाहीत? तरीही तुम्ही शिक्षक बनू शकता, ‘हे’ आहेत पर्याय जाणून घ्या सविस्तर

CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर असे अनेक विद्यार्थी निराश होतात. त्यांना वाटते की त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पण खरंच असं आहेत का? CTET हा केवळ एकच मार्ग आहे का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 27, 2026 | 02:04 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर निराश होऊ नका
  • CTET का आवश्यक आहे?
  • CTET परिक्षेशिवाय इतर पर्याय कोणते?
Teaching Career Options Without CTET : लाखो तरुण शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतात पण फक्त स्वप्न पाहून उपोय नाही त्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. पण अशीच मेहनत करुनही CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर असे अनेक विद्यार्थी निराश होतात. त्यांना वाटते की त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पण खरंच असं आहेत का? CTET हा केवळ एकच मार्ग आहे का? जर तुम्ही योग्य दिशेने विचार आणि नियोजन केले, तर तुम्ही CTET शिवायसुद्धा तुम्ही शिक्षक म्हणून यशस्वी करिअर घडवू शकता पण कसं समजून घेऊयात.

RGNAU Vacancy 2026: सेंट्रल एव्हिएशन युनिव्हर्सिटीमध्ये निघाली Non-Teaching भरती, दर महिन्याला 60 हजार पगार, असा करा अर्ज

सर्वप्रथम CTET का आवश्यक आहे?

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांमध्ये आणि इतर सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने CTET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचे ध्येय या शाळांमध्ये नोकरी मिळवणे असेल, तर CTET अनिवार्य आहे. पण देशात शिकवण्याचे इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

खाजगी शाळांमध्ये शिकवण्याच्या संधी

जर तुम्ही CTET उत्तीर्ण नसाल, तरीही तुम्ही खाजगी शाळांमध्ये सहजपणे शिकवू शकता. येथे CTET परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य नाही. अनेक चांगल्या खाजगी शाळा पदवी आणि बी.एड.च्या आधारावरही शिक्षकांची भरती करतात. सुरुवातीचा पगार कमी असू शकतो, पण तुमच्या अनुभवाने तुम्ही लक्षणीय वाढीची अपेक्षा करू शकता.

राज्यस्तरीय TET परीक्षेची तयारी करा

प्रत्येक राज्य स्वतःची TET परीक्षा आयोजित करतं, जसे की UPTET, REET, HTET अशा परीक्षा आहेत त्याची तयारी तुम्ही करु शकता. तुम्ही CTET मध्ये यशस्वी झाला नसाल, पण राज्यस्तरीय TET तुमच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. तिचा अभ्यासक्रम थोडा वेगळा असतो आणि स्पर्धाही अनेकदा कमी असते.

कोचिंग आणि होम ट्युशनने करिअरची सुरुवात

आजकाल कोचिंग आणि घरी शिकवणी देणे हे एक उत्तम करिअरचे पर्याय बनले आहेत. जर तुमच्या विषयावर तुमची चांगली पकड असेल, तर तुम्ही घरून शिकवायला सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्हाला ओळख मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. विशेषतः सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिकवणीला खूप मागणी आहे.

ऑनलाइन शिक्षणाकडे कल

डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही यूट्यूब चॅनेल, ॲप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे शिकवू शकता. यामुळे तुम्हाला अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. त्यामुळे तुमचं स्वप्न साकार होण्यास मदत होते.

शैक्षणिक साहित्यासाठी लेखन आणि एडटेक क्षेत्रातील करिअर

जर तुम्हाला शिकवण्यासोबतच लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही शैक्षणिक सामग्री लेखनात करिअर करू शकता. आज अनेक एडटेक कंपन्या, नोट्स काढणे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि व्हिडिओ स्क्रिप्ट लिहिणे यांसारख्या कामांसाठी शिक्षकांना कामावर घेतात.
सीटीईटी (CTET) उत्तीर्ण न होण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ही परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुमच्या कमकुवत बाजू ओळखा, एक नवीन रणनीती तयार करा आणि पुन्हा तयारी करा. योग्य मार्गदर्शन आणि सरावाने, तुम्ही पुढच्या वेळी नक्कीच यशस्वी होऊ शकता.

Career News: विद्यार्थ्यांनो शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणार B.Ed ची CET प्रवेश परीक्षा

Web Title: Did not clear the ctet you can still become a teacherhere are the alternatives find out the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • CTET Paper 2
  • Exam
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार
1

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप
2

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
3

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी
4

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.