Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! ‘या’ तारखेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार

इन-हाऊस कोट्याच्या बदलांनंतर विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना पसंतीक्रम सुधारण्यासाठी अधिक वेळ देण्यात येत आहे, असे शिक्षण संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2025 | 09:33 PM
11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! 'या' तारखेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार

11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! 'या' तारखेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार

Follow Us
Close
Follow Us:
पुणे: इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम दिनांक ५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्याच्या सूचनेनुसार, इन-हाऊस कोट्याच्या बदलांनंतर विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना पसंतीक्रम सुधारण्यासाठी अधिक वेळ देण्यात येत आहे, असे शिक्षण संचालकांकडून सांगण्यात आले आहे.
राज्य मंडळामार्फत यंदा राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दि २६ मे पासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जूनला जाहीर होणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख मंगळवारी ३ जून होती ती वाढवून ५ जून गुरवारी दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज सादर करण्याचे आव्हान शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशासाठी राज्यातून आतापर्यंत १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर तर पुणे विभागात १ लाख ८७ हजार ९२५ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पहिल्या नियमित फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्ता गुरुवारपर्यंत अर्ज करता येणार आहे.

11th Admission: इन-हाऊस कोट्यातील नव्या नियमांमुळे ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ; नेमके काय आहे प्रकरण?

 प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंतीक्रमानुसार आरक्षण, गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी महाविद्यालयाचे वाटप केले जाणार आहे. एकाच वेळी विद्यार्थी कोटपांतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकतील. प्रत्येक फेरीसाठी विद्यार्थ्याने संमती नोंदविणे आवश्यक आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह आणि पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाच जूनला तर अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आठ जूनला जाहीर होईल.

….अशी राबविली जाणार फेरी

 तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ५ जून रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दोन दिवस तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी याबाबत हरकती नोंदविता येईल. अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जून रोजी जाहीर केले जाणार आहे. त्याआधारे विद्यार्थी आणि महाविद्यालय निवड  वाटप प्रक्रिया पार पडेल. प्रवेशासाठी महाविद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी १० जून रोजी जाहीर होईल. प्रवेश घेणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेश नाकारणे आणि प्रवेश रद्द करणे ही प्रक्रिया – ११ ते १८ जून दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाबाबत 
कनिष्ठ महाविद्यालये – ९,३४३
नोंदणी केलेले विद्यार्थी – १०,८५, ८५१
‘कॅप’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा – १८,७५,७३५
‘कोटा’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा – २,१३,४१५
एकूण प्रवेशाच्या उपलब्ध जागा – २०,८९,१५०
अधिकृत ‘व्हॉट्सअॅप चॅनेल’
अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मदत व्हावी म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे
‘https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C‘ हे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू केले आहे. याद्वारे प्रवेश प्रक्रियेतील माहिती, सूचना दिल्या जातात.
अधिकृत संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in
मदतीसाठी हेल्पलाईन: ८५३०९५५५६४

अधिक माहिती व शंका निवारणासाठी ई-मेल: support@mahafyjcadmissions.in

Web Title: Directorate of education extend date to 5 june 2025 for 11 th students admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
1

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड
2

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
3

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या
4

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.