फोटो सौजन्य - Social Media
पूर्वीच्या काळात चोरटे भर रानामध्ये लोकांना लुटायचे. गर्दीच्या ठिकाणी लोकांचे मोबाईल फोन तसेच पाकीट मारायचे. चालत्या गाडीवरून रहदाऱ्यांचे दागिने खेचायचे. तर कधी कधी मोठी मोठी दुकाने फोडायचे. परंतु, हे प्रकार जरी थांबले नसले तरी काही प्रमाणात कमी झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे. त्याला कारणही गंमतीचे आहे. जगामध्ये रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या विकासाच्या जगामध्ये चोर लुटर्यांनी स्वतःचाही विकास करून घेतला आहे. पूर्वीच्या काळी टोळी बनवून लोकांना लुटणारी गॅंग आता डिजिटल झाली आहे. एकंदरीत, चोरांवर डिजिटलायजेशनचा बऱ्यापैकी प्रभाव पडला आहे. आता चोर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोंकांना लुटण्यास चालू झाले आहेत.
सोशल मीडियावर असे अनेक कॉमेंट्स पाहायला मिळतात, ज्यात असे लिहिलेले असते कि नोकरीसह गरज असल्यास आम्हाला संपर्क साधा. कधी कधी तर लोकांना नोकरी शोधत आहात का? विचारण्यासाठी कॉल तसेच मेसेज केले जातात. तेव्हा काही नोकरीच्या शोधात असणारी लोकं अशा मेसेज तसेच कॉलला भुलून जातात आणि चोरांनी विणलेल्या जाळ्यामध्ये अडकतात. अशी अनेक प्रकरणे आजकाल पाहायला मिळतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेश राज्यात घडली आहे. दस्तऐवज Whatsapp केल्याने चक्क २५० कोटींचे GST बिल आले आहे.
मुज्जफरनगरचा रहिवाशी असलेला अश्वनी कुमार डिजिटल चोरांच्या विणलेल्या जाळ्यामध्ये अडकला आहे. त्याला काही दिवसांपूर्वी नोकरी संदर्भात एक कॉल होता. अश्वनी नोकरीच्या शोधामध्ये होता, त्यामुळे त्याने नोकरीच्या लालसेपोटी कॉलवर मागितलेले सगळे दस्तऐवज Whatsapp च्या माध्यमातून पाठवून दिले. त्याचबरोबर त्याच्याकडून १७५० रुपये शुल्कही आकारण्यात आले होते. यादरम्यान काही दिवसांनी अश्वनीच्या दारावर GST अधिकाऱ्यांनी धडक दिली. अश्वनीच्या नावावर चक्क २५० कोटींचे बिल आले होते.
GST विभागाने या प्रकरणावर कारवाई करण्यास सुरु केले आहे. या प्रकरणाविषयी सांगताना एसपी ग्रामीण आदित्य बंसल म्हणतात कि,” अश्वनीच्या दस्तऐवजांचा वापर करून बँक खाते तयार केले गेले आणि त्याच्या नावाने या बोगस कंपनीने GST घोटाळा केला आहे.” अशा प्रकारचं घोटाळ्यांमुळे लोकांना सावध केले जात आहे. अनोळखी व्यक्तींना आपले दस्तऐवज पाठवणे किंवा अनोळखी संकेतस्थळावर क्लीक करणे, आपल्याला कठीण जाऊ शकते.