फोटो सौजन्य - Social Media
हरियाणा राज्यात एक विशेष घटना घडली आहे. सध्या भारतामध्ये बेरोजगारीचा दर वाढत चालला आहे असे बहुतेक भारतीयांचा आरोप आहे. वाढत्या बेरोजगारीच्या दराला आळा घालण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी प्रयत्न करताना दिसून येत आहे. भारत सरकारने देशातील युवांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांना अनेक युवकांनी प्रतिसाद दिला होता. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीच्या दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. इतके कि, भारतात स्पर्धेचे वातावरण तयार झाले आहे. देशात प्रत्येक गोष्टींमध्ये स्पार्धा पाह्यला मिळत आहे. यामुळे अनेक प्रत्यत्न करूनही काहींच्या नशिबामध्ये ध्येयप्राप्ती होत नाही आहे. कौशलय असूनही अनेकांना आपले क्षेत्र सोडूनइतर क्षेत्रात काम करावे लागत आहे.
हे देखील वाचा : IIIT अलाहाबादमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदी भरती सुरु; असे करता येईल अर्ज
नुकतेच हरियाणा राज्यामध्ये सरकारी क्षेत्रात बंपर भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती स्वीपर पदासंबंधित आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज नोंदवण्यास सुरुवात केले. ६ ऑगस्टपासून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. तर इच्छुक असलेले उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत आपला अर्ज नोंदवू शकतात, असे अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले होते. या कामासाठी निवड केलेल्या उमेदवाराला दरमाह १५,००० रुपयांचे वेतन देण्यात येणार होते. या नोकरीसाठी ४६,००० उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील विशेष गोष्ट अशी कि या उमेदवारांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. त्यामुळे उच्च शिक्षित असणाऱ्या उमेदवारांनी स्वीपरच्या व्हॅकन्सीसाठी हजारोंच्या भरात अर्ज का केले बरं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे स्वीपरच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. या अर्ज कर्त्या उमेदवारांपैकी एक असलेल्या उच्च शिक्षित मनीषने आपले मनोगत लोकांसमोर मांडले आहे. तो म्हणतो कि,” खाजगी शाळेमध्ये तसेच कंपनीमध्ये काम करून आम्हाला जास्तीत जास्त १०,००० रुपये दरमाह वेतन मिळतो. पण हे काम आमच्यासाठी नियमित कामाची खात्री देणारे आशेचा किरण आहे.
हे देखील वाचा : AIIMS गुवाहटीमध्ये प्रोफेसर पदासाठी जागा रिक्त; भरती प्रक्रियेला सुरुवात
तसेच दिवसभर झाडू मारायचे काम नसते. त्यामुळे फावल्या वेळेमध्ये आम्ही इतर कामेही करू शकतो.” रोहतकमध्ये स्थायिक असलेल्या सुमित्राने देखील या नोकरीसाठी अर्ज केला आहे. या अगोदर तिने HSSC साठी अर्ज केला होता. परंतु, गोष्ट काही बनली नसल्याने स्वीपर व्हॅकन्सीला शेवटचा पर्याय मानत नोकरीसाठी अर्ज केले आहे.