फोटो सौजन्य: iStock
लहानपणापासूनच आपल्या सर्वांच्या मनात विमानाबद्दल एक वेगळेच आकर्षण असते. हेच आकर्षण पुढे जाऊन अनेकांचे स्वप्न बनते. जसे की लहानपणी अनेक जण हवेत उडण्याचे स्वप्न बघतात. तर काही विमानातील केबिन क्रू मध्ये जॉब मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. अशातच जर तुम्ही सुद्धा विमानातील केबिन क्रू चा एक भाग होऊ इच्छित असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
UAE च्या एमिरेट्स एअरलाइनने त्यांच्या लेटेस्ट ग्लोबल रिक्रुटमेंट प्रोग्रॅम अंतर्गत केबिन क्रू पदांसाठी अर्ज मागवले आहेत. Emirates ही जगातील सर्वात प्रतिष्ठित एअरलाइन्सपैकी एक आहे. ऑनलाइन अर्ज करून तुम्ही या एअरलाइनच्या क्रू मेम्बर्सचा भाग होऊ शकता.
दुबईस्थित एअरलाइनने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या मेसेज म्हटले आहे की, “हा फक्त एक गणवेश नाही. तर तो एक जीवनशैली आहे. तुमचा एमिरेट्स केबिन क्रू प्रवास सुरू करा आणि तो तुम्हाला कुठे घेऊन जातो ते पहा!” अर्जदार आता एमिरेट्स ग्रुप करिअर वेबसाइटद्वारे त्यांचा रिज्युम सबमिट करू शकतात.
MBA केल्याने मिळतो उत्तम पगार? काय आहे फायदे? जाणून घ्या
एमिरेट्स एक डायनॅमिक, सर्व्हिस ओरिएंटेड व्यक्ती शोधत आहे जे मल्टीकल्चरल टीममध्ये चांगले प्रदर्शन करू शकेल. त्यासाठी अर्जदारांनी काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत.
– अर्जदाराचे किमान वय 21 वर्षे असले पाहिजे
– अर्जदाराची किमान उंची 160 सेमी आणि जास्तीत जास्त 212 सेमी असली पाहिजे
– बोली आणि लेखी भाषेत अस्खलित इंग्रजी आवश्यक (अतिरिक्त भाषांचे ज्ञान अधिक चांगले )
– आदरातिथ्य किंवा ग्राहक सेवेत किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
– किमान हायस्कूल डिप्लोमा (12वी) असणे आवश्यक आहे
– गणवेश परिधान करताना कोणताही टॅटू दिसणार नाही
– UAE रोजगार व्हिसाच्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत
शेतकऱ्याची मुलगी तपस्या परिहार झाली IAS अधिकारी? संघर्ष आणि प्रामाणिकपणाची प्रेरणादायी कथा
एमिरेट्सच्या मते, केबिन क्रू सदस्यांनी विमानात सुरक्षितता आणि सेवेचे हाय स्टॅंडर्ड सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. या भूमिकेसाठी आत्मविश्वास, अनुकूलता आणि दबावाखाली शांत राहण्याची क्षमता आवश्यक आहे. तसेच, यासाठी एअरलाइन प्रशिक्षण देखील देण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. दर आठवड्याला भरती कार्यक्रम दुबई आणि निवडक आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये आयोजित केले जाईल.
बेसिक पगार: 4,430 दिरहम/महिना (रु. 1.03 लाख)
उड्डाण वेतन: 63.75 दिरहम (रु. 1490 )/तास (80-100 तास/महिना यावर आधारित)
सरासरी मासिक वेतन: 10,170 दिरहम (रु. 2.37 लाख)