Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

त्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी शाळा महासंघाने शाळा संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. खंडणी आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख मागण्यांचे निवेदन सरकारला सादर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 06:19 PM
इंग्रजी शाळांना 'संरक्षण कायदा' लागू करा! (Photo Credit- X)

इंग्रजी शाळांना 'संरक्षण कायदा' लागू करा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा!
  • संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ‘ईएसएम’ आक्रमक
छत्रपती संभाजीनगर: खासगी व इंग्रजी शाळांना त्रास देणायचे प्रकार वाढले आहेत. संस्था चालकांना धमक्या देणे, खंडणी मागणे, शिक्षक कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचा घटनांत वाढ झाली आहे. यासाठी शाळांना संरक्षण कायदा लागू करा, अशी मागणी इंग्लिश स्कूल महासंघ (ईएसएम) शासनदरबारी गेले आहेत. महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत इंग्रजी शाळा व संस्था चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे मदतीसाठी ठराव घेण्यात आला. मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षण, नगर विकास व वाणिज्य मंत्री विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रलंबित १० मागण्या निकाली काढून अध्यादेश / परिपत्रक जारी करावे असे पत्रात नेमणूक करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी शाळांसाठी शाळा संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीचा समावेश आहे.

इंग्रजी शाळेची पालकांकडे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक फीस थकित असते. पालकांनी ती वेळेत भरावी यासाठी शाळा प्रशासन पालकांकडे मागणी करतात परंतु, शाळेचा संबंध नसलेल्या व्यक्तिंकडून शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शाळेच्या कामात हस्तक्षेप करणे, खोट्या तक्रारी करणे, वर्गणी किंवा खंडणी मागणे, पैशाच्या लालसेपोटी शाळेवर व कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडतात. यासाठी अनेक शिक्षक आमदारांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून शाळा संरक्षण कायदा करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा इंग्लिश स्कूल्स महासंघाने निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत. शाळा संरक्षण कायदा लागू करा.

वर्षाअखेर शाळेची शैक्षणिक फीस पालकांनी भरलीच पाहिजे अन्यथा, शाळा प्रशासन पाल्याचा प्रवेश रद्द करून पालकांवर फिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल. याबाबत शासन स्तरावरून शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करावे. शाळा भरत असलेल्या (भाड्याची किंवा स्वतःची) इमारतीस लाईट बील व प्रॉपर्टी टैक्स व्यवसायिक दराने लावू नये. प्रॉपर्टी टॅक्समध्ये ५० टक्के सवलत देऊन त्यात सामान्य कर व शिक्षण आणि स्वच्छता कर वगळून लावण्याबाबत राज्यातील सर्व मनपा व नगरपालिका आयुक्तांना अध्यादेश जारी करावा.

NEET UG 2026 : तुम्हालाही सरकारी मेडिकल कॉलेजमधून MBBS करायचंय? मग NEET UG परीक्षेत किमान ‘इतके’ गुण मिळवणं आहे अनिवार्य

मान्यताप्राप्त शाळांनाच जोडून पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू करण्यास परवानगी असावी. आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण योजन इयत्ता १२वी पर्यंत करावी. आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रतिपूर्तीची रक्कम कायद्याप्रमाणे वर्षातून दोनवेळा व ‘पीटीए’ने मंजूर केलेल्या व ज्या-त्या शाळेच्या फीस प्रमाणे मिळावी, या मागण्या निकाली काढून अध्यादेश वा परिपत्रक निकाली काढावे अशी मागणी इंग्लिश स्कूल्स महासंघातर्फे डॉ. प्रसाद सोनवणे प्रल्हाद शिंदे, हरिष शिंदे, रत्नाकर फाळके, सुदीप डेब, भगवान पवार, योगेश अंभोरे आदींनी केली आहे.

आरटीईची थकीत प्रतिपूर्ती द्या

कोर्टात गेलेल्या व न गेलेल्या शाळांना आरटीई विद्यार्थ्यांची प्रतिपूर्तीची सर्व थकित रक्कम मिळावी. शिक्षण मंडळ परिक्षा बोर्डाने १०वी व १२वी साठी पाच वर्ष वर्धित मंडळ मान्यता मिळालेल्या शाळांना कायम मंडळ मान्यता देण्याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून सर्व विभागीय शिक्षण मंडळांना परिपत्रक निर्गमित करावे, तसेच प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने स्वयः अध्ययन करून मागणी केलेल्या विषयाचा परिक्षा फॉर्म भरता यावा व परिक्षा देण्याची परवानगी असावी. अनुदानीत शाळा प्रमाणे इंग्रजी शाळाना लोकप्रतिनिधींचा निधी वापरता यावा तसेच क्रीडा विभागाच्या सर्व योजना लागू कराव्यात, या मागण्या देखील महासंघाने शासनाकडे मांडल्या आहेत.

अरे देवा ! आता करायचं तरी काय ? उत्तरपत्रिकांचे गठे, ‘पॅट’ परीक्षा, जनगणना आणि मतदारयादी शिक्षकांची होतेय दैना

Web Title: Enforce the protection act for english medium schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • School

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.