Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा! ‘या’ तारखेला करण्यात आले आयोजन

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा २१ मार्च रोजी लोकभवन, मुंबई येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून C. P. Radhakrishnan उपस्थित राहणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2026 | 06:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती C. P. Radhakrishnan प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे राज्यपाल Jishnu Dev Varma, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

सोमवारपासून ‘वैद्यकीय’ परीक्षा! राज्यातून ४३,९२८ हजार विद्यार्थी; १७५ केंद्रांवर होणार पेपर

कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणारे हे विद्यापीठ राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जुलै २०२२ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाने उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिझाइन तसेच अल्पकालीन कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे विविध केंद्रे कार्यरत आहेत.

विद्यापीठाने उद्योग क्षेत्राशी मजबूत भागीदारी निर्माण केली असून पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. तसेच ‘रुबिक फ्रान्स’च्या सहकार्याने ‘बॅचलर ऑफ डिझाईन’सारखे अत्याधुनिक अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य सेवेशी संबंधित वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने ‘जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले असून यात आयटीआयशी संबंधित विविध उपक्रमांचे प्रदर्शन सादर होणार आहे. यामध्ये टोयोटा किर्लोस्कर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, ऍटलास, दासयू एव्हिएशन तसेच स्वदेश फाउंडेशनसारख्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या यशोगाथाही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

CET परीक्षेबाबत परीक्षा केंद्रांची माहिती जाहीर; अंतिम प्रवेशपत्रात ‘या’ माहितीला करण्यात आले प्रसिद्ध

याशिवाय ‘कोड विदाउट बॅरियर’ या उपक्रमांतर्गत मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या सहकार्याने राज्यातील १० हजार महिला शिक्षक व विद्यार्थिनींना एआय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना जनरेटिव्ह एआय क्षेत्रात सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा हा पहिला दीक्षांत समारंभ केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नसून राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

Web Title: First convocation ceremony of ratan tata maharashtra state skill university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • education
  • Mumbai University
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास
1

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
3

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.