Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांग शाळांच्या अनुदानात पुन्हा अडथळा! मंत्रालयाने डझनभर त्रुटी काढून ४.४७ कोटींचे प्रस्ताव परत पाठवले

राज्यातील १७ शासकीय दिव्यांग शाळांच्या ४.४७ कोटी रुपयांच्या वेतनेतर अनुदानाच्या प्रस्तावात मंत्रालयाने डझनभर त्रुटी काढल्याने ते परत आले. यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 02:44 PM
दिव्यांग शाळांच्या अनुदानात पुन्हा अडथळा! (Photo Credit - X)

दिव्यांग शाळांच्या अनुदानात पुन्हा अडथळा! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • अडथळ्यांची शर्यत!
  • १७ शासकीय दिव्यांग शाळांच्या अनुदानात पुन्हा खोडा
  • ४.४७ कोटींचे प्रस्ताव मंत्रालयातून त्रुटींमुळे परत
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील १७ शासकीय दिव्यांग शाळांच्या अनुदानामध्ये पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. सुमारे ४ कोटी ४७ लाख ८१ हजार ५० रुपये किमतीचे अनुदानाचे प्रस्ताव दिव्यांग आयुक्तालयाकडून मंत्रालयात गेले होते. मात्र, मंत्रालयाने त्या प्रस्तावांमध्ये ‘डझनभर’ त्रुटी काढून ते पुन्हा आयुक्तालयाकडे परत पाठवले आहेत. यामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘नवराष्ट्र’ ने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतरच सूत्रे हलली होती आणि फायलींना गती मिळाली होती.

बंद होण्याच्या मार्गावर शाळा

२० दिव्यांग शाळा होत्या, त्यापैकी तीन शाळा आता बंद झाल्या आहेत. उर्वरित १७ शाळा पुणे, सांगली, ठाणे, रायगड, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जळगाव, नाशिक, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, अकोला यासह इतर ठिकाणी कार्यरत आहेत. वेतनेतर अनुदान शाळांना मिळत नसल्याने काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांवर ‘गुड डे टू गुड नाईट’ साहित्य आणि आवश्यक सोयीसुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. साहित्य पुरवठादारांचे वेतन मिळणेही दुरापास्त झाले आहे.

प्रशासकीय त्रुटी आणि संहितेचा वाद

नोव्हेंबर महिन्यात ‘राज्यातील दिव्यांगांच्या २० कर्मशाळांचे कोट्यवधींचे अनुदान थकीत’ याबाबत ‘नवराष्ट्र’ने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तालयाने प्रस्ताव मंत्रालयाला पाठवले होते. परंतु मंत्रालयाने त्यात डझनभर त्रुटी आणि ‘काही प्रशासकीय चौकटीपलीकडील चुका’ काढल्या. दिव्यांग बालविकासगृहाच्या भाड्याचा प्रश्न अधांतरी असल्याचे कारण सांगितले गेले.

हे देखील वाचा: Pratap Sarnaik : आता बसच्या पासाची चिंता मिटली; शाळकरी मुलांसाठी प्रताप सरनाईकांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

संहितेचा वाद

शासकीय दिव्यांग शाळांना १८ जुलै २०१८ च्या आदेशानुसार शाळा संहिता लागू होत नाही. ही संहिता विनाअनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, गतिमंद बालगृह, आधारगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्र आणि पुनर्वसन प्रकल्पांना लागू असते.

विधानपरिषदेत लक्षवेधी

या गंभीर प्रश्नावरून विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली आहे (सूचना क्रमांक २५७). यावर तात्काळ इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने राज्यातील १७ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याना दिले आहेत.

दिरंगाईला कोण जबाबदार?

माहितीनुसार, शासकीय शाळांचे वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक असते. मात्र, आयुक्तालयाच्या आस्थापनातील काही मंडळी हे प्रस्ताव जाणूनबुजून अडगळीत टाकतात, यामागे अर्थकारणाची चर्चा आहे. या दिरंगाईला स्वतः आयुक्तालय दोषी असल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यास ही दिरंगाई थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा: हीच ती श्रीमंतांची शाळा! फीज इतके महाग की मुंबई-पुण्यात घ्याल फ्लॅट, ४ विद्यार्थ्यांमागे येथे १ शिक्षक

Web Title: Funding for 17 government schools for the disabled has been stalled again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Maharashtra Schools

संबंधित बातम्या

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण
1

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी
2

Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्…
3

धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.