फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत अशा अनेक शाळा आहेत जिथे मोठमोठ्या कलाकारांचे, अभिनेत्यांचे तसेच व्यावसायिकांचे मुले शिकतात. पण तुम्हाला माहिती आहे का? जगामध्ये अशा पण काही शाळा आहेत, जिथे राजघराण्यातील मुलं शिकतात. येथे राजकुमार आपले शिक्षण घेतात. या शाळेचे नाव आहे ‘इन्स्टिट्यूट ले रोझी, स्वित्झर्लंड’. स्वित्झर्लंडच्या रोले येथे स्थित असणाऱ्या या शाळेची स्थापना पॉल-एमिल कॉर्नेल यांनी केली. इतकेच नव्हे तर या शाळेला विविध देशातून विद्यार्थी जण शिक्षण घेण्यासाठी भेट देतात, पण ती संख्या क्वचितच आहे.
या शाळेची वार्षिक फी इतकी जास्त आहे की आपण मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे फ्लॅट घेऊ शकतो. या शाळेची वार्षिक फी 1,13,73,780 रुपये म्हणजेच १.१४ कोटी इतकी आहे. या फीजमध्ये निवास, जेवण, शिक्षण, संगीत, खेळ, घोडेस्वारी आणि विविध उपक्रमांचा समावेश आहे. या शाळेच्या अभ्यासक्रमात इंटरनॅशनल बॅकलॅरिएट (IB) आणि फ्रेंच बॅकलॅरिएट यांचा समावेश आहे. हे महागडे शिक्षण फक्त जगातील गडगंज श्रीमंतांच्या मुलांसाठी आहे.
एक कोटींहून जास्त रक्कम भरून या शाळेत आधुनिक वर्गखोल्या, मोठा क्रीडा संकुल, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट्ससारख्या सुविधांचा फायदा होतो. आता स्वित्झर्लंड म्हंटल तर बर्फ तर येणारच. या दिवसात या शाळेत स्कीइंग, स्नोबोर्डिंग, आइस हॉकीसारखे खेळ खेळले जातात. अशा खेळांचे जागतिक दर्जावर सर्व घेतले जातात. या शाळेने राबवलेली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे येथील शिक्षण! प्रत्येक ३ ते ४ विद्यार्थ्यांमागे येथे १ शिक्षक ठेवण्यात आला आहे, जे विद्यार्थ्यांची शिस्त आणि अभ्यासावर पूर्णपणे लक्ष देतात. शाळेमध्ये 60 देशांतील 450 विद्यार्थी आहेत तर १२० तद्न्य शिक्षणमंडळी येथे कार्यरत आहे.
या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रिया अत्यंत निवडक आहे. येथील शिक्षण संस्था मुलांच्या शिक्षणावर जास्त लक्ष देते.