
photo- yandex
राज्यातील ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तिसऱ्या नियमित फेरीत प्रवेश अर्ज भरणे व पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम नोंदविले आहेत.
तिसऱ्या नियमित फेरीत महाविद्यालय वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी २३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
अमरावती – ४९,००५
छ. संभाजीनगर – ६५,१४५
कोल्हपुर – ५७,४६०
लातूर – ३४,४३३
मुंबई – १,४७,३४०