Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गो. से. महाविद्यालयाचा औद्योगिक शैक्षणिक दौरा! बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्सच्या २१ विद्यार्थ्यांचा सहभाग

उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक स्वयंचलन, उत्पादन प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा प्रत्यक्ष वापर समजून देणे हा होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक स्वयंचलन, उत्पादन प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता.

शिक्षण विभागाचा शाळांना दिलासा! स्वयंमूल्यांकन प्रक्रियेला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत माहिती भरणे बंधनकारक

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बिस्किट निर्मिती प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास केला. कच्च्या मालाचे अचूक प्रमाणात मिश्रण, पीठ तयार करणे, साच्यांच्या सहाय्याने आकार देणे, नियंत्रित तापमानात बेकिंग, त्यानंतरचे थंड करणे, क्रीम भरणे आणि अखेरीस उच्च-गती यंत्रणेद्वारे पॅकेजिंग या सर्व टप्प्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने कशी कार्यान्वित केली जाते, याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या औद्योगिक भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे उत्पादन प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक्सची भूमिका समजून घेण्याची संधी होती. ओव्हनमधील तापमान नियंत्रणासाठी वापरली जाणारी अचूक प्रणाली, विविध सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्सचे कार्य, पीएलसी (Programmable Logic Controller) आधारित नियंत्रण व्यवस्था तसेच गुणवत्ता तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष औद्योगिक वापर यामधील दुवा स्पष्टपणे समजला.

उत्तर प्रदेशात दहावी बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल

या भेटीत बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्स तृतीय वर्षातील (सहावा सत्र) एकूण २१ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसोबत विभागप्रमुख डॉ. जे. एस. तातेड, डॉ. वाय. एस. म्हैसागर, प्रा. आय. जे. कराळे तसेच प्रयोगशाळा सहाय्यक अंकुश माळवंदे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील कार्यपद्धतीची ओळख झाली असून, त्यांच्या करिअर दृष्टीनेही हा अनुभव उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Web Title: Gs colleges industrial educational tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण
1

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
2

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…
3

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
4

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.