फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Har Ghar Tiranga 2026: ‘विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा.’ ही ओळ प्रत्येक भारतीयाच्या आन, बान आणि शानचे प्रतीक आहे. भारताच्या संविधान सभेने २२ जुलै १९४७ रोजी तिरंग्याला स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले होते. हा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णदिन म्हणून नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे आणि हाच मान-सन्मान जन-जनंपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय नागरिक आपापल्या घरी तिरंगा फडकवताना दिसतात. भारताचा प्रत्येक नागरिक आपल्या घरावर आणि कार्यस्थळावर राष्ट्रीय ध्वज (तिरंगा) फडकवावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे. एवढेच नव्हे तर, या मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना तिरंग्यासोबतची आपली सेल्फी अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागते. मात्र, तिरंग्यासोबतची सेल्फी कशी आणि कुठे अपलोड करायची? आणि ‘हर घर तिरंगा’चे प्रमाणपत्र कसे मिळवायचे? हे प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतात.
Celebrate our eternal values of pride & unity in diversity by joining the #HarGharTiranga movement from 9-17 August. Hoist at home & pay tribute to the spirit of Vande Mataram. Don’t forget to upload your selfie with Tiranga on https://t.co/gaoQubIRkC #HGT2026@MinOfCultureGoI… pic.twitter.com/hxXDO92u9x — Ministry of Heavy Industries (@MHI_GoI) August 13, 2026
यावर्षी १५ ऑगस्ट रोजी देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात ९ ऑगस्ट २०२६ रोजी झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी घराच्या टेरेसवर किंवा छतावर पूर्ण सन्मानाने राष्ट्रीय ध्वज फडकवावा लागेल आणि त्यासोबत सेल्फी काढून अधिकृत वेबसाइटवर अपलोड करावी लागेल, त्यानंतर प्रमाणपत्र देखील मिळेल.
1. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट harghartiranga.com वर जावे.
2. तिथे ‘अपलोड सेल्फी’ (Upload Selfie) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
3. यानंतर, सावध मुद्रेत (डिसेंट पोझमध्ये) काढलेला फोटो किंवा सेल्फी अपलोड करावा.
4. यासाठी ‘अपलोड मीडिया’ लिंकवर क्लिक करा आणि तिथे फोटो अपलोड करावा.
5. सेल्फी अपलोड केल्यानंतर ‘डाउनलोड सर्टिफिकेट’ या लिंकवर क्लिक करावे.
अशा प्रकारे तुम्ही तिरंगा फडकवल्याचे प्रमाणपत्र मिळवू शकता.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत मिळालेले प्रमाणपत्र जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करायचे असेल, तर तुम्ही #HarGharTiranga2026 किंवा #HarGharTiranga या दोन हॅशटॅगचा वापर करू शकता. एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमाणपत्र पोस्ट करताना हे हॅशटॅग वापरता येतील.
संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याची आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुरुवात ९ ऑगस्टपासून झाली असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२६ आहे. याचा अर्थ १५ ऑगस्टनंतरही तुम्हाला दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळेल. १७ ऑगस्टपर्यंत तिरंग्यासोबतचा फोटो पोर्टलवर अपलोड करता येईल आणि याद्वारे प्रमाणपत्रही मिळवता येईल.





