संग्रहित फोटो
यापुढील निवडणुकीतही महेश शिंदे यांना प्रतिस्पर्ध्यासह, स्वकीयांचा सामना करावा लागणार आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले. प्रतिस्पर्ध्याच्या तंबुतील तब्बल अकरा मते फोडून लढाई बरोबरीला महेश शिंदे यांनी आणल्याने चिठ्ठीवर विजयी झालेल्या राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज असल्याचेही आता बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत महेश शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीतही महेश शिंदे विरोधी सर्वजण असे राजकीय स्वरूप होते. विरोधकांनी हाच कित्ता जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतही गिरवत यश संपादन केले असले तरी महेश शिंदे यांनी हम भी किसीसे कम नहीं असे म्हणत आपल्याकडे ३३ मतांची बेरीज असतानाही आपले समर्थक सुनील खत्री यांना दुसरीवेळ बँकेच्या निवडणुकीत उतरवले.
गेल्या वेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे निवडणुकीचा निकाल चिठ्ठीवर येऊन सुनील खत्री यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे शिवाजीराव महाडिकांचा पराभव झाला होता. हीच वेळ सुनील माने यांच्यावर आली. परंतु सुनील मानेना यावेळी नशिबाने साथ दिल्याने ते जिंकले. चिठ्ठीने विजय दिलेल्या सुनील खात्री यांची नशिबाने साथ सोडल्याने चिठ्ठीने त्यांचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावेळी सुनील खत्री विरुद्ध शिवाजीराव महाडीक अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी महेश शिंदे हे नवखे होते. अनुभव पाठीशी नव्हता. त्यावेळी २२ ते २५ मतांची बेरीज असताना सुनील खत्री ४५ मतांपर्यंत पोहोचले. विरोधात असलेल्या शिवाजीराव महाडिकांना तेवढीच मते मिळाली. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा व नशिबाचा फायदा सुनील खत्रीना झाला होता. यावेळी मात्र ज्यांनी गेल्या निवडणुकीत मदत केली ती पार्टीच समोर आल्यामुळे सुनील खत्री यांच्या मनात निवडणुकीच्या सुरुवातीपासून पराभवाची पाल चुकचुकत होती. तरीही महेश शिंदे यांच्यासारखे कणखर नेतृत्व सोबत असल्यामुळे ते डगमगले नाहीत.
हे सुद्धा वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
शिवसेना, काँग्रेसची मते निर्णायक ठरली
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २, काँग्रेसने १ मत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील माने यांना दिले असल्याची सध्या चर्चा आहे. ही दोन्ही मते विजयासाठी निर्णायक ठरल्याचीही सध्या चर्चा आहे.
Ans: कोरेगाव सोसायटी गटात सुनील खत्री आणि सुनील माने यांच्यात अटीतटीची लढत झाली.
Ans: आमदार महेश शिंदे यांच्याकडे ३३ मतांची ताकद असतानाही त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या गटातील तब्बल ११ मते आपल्या बाजूने वळवून सुनील खत्री यांना ४४ मतांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांची एकाकी झुंज चर्चेत आली आहे.
Ans: चर्चेनुसार, शिवसेना (शिंदे गट)ची दोन आणि काँग्रेसचे एक मत सुनील माने यांच्या बाजूने गेले. ही तीन मते विजयासाठी निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.






