वैभव सूर्यवंशी (फोटो- ians)
वैभव सूर्यवंशी सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत बिहारचे नेतृत्व करत आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मेन्स टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनण्याचा जागतिक विक्रम रचला आहे. आज बिहारचा सामना सौराष्ट्र संघाशी झाला.
राणा जी को छोड दिया! Syed Mushtaq Ali ट्रॉफीपूर्वी दिल्ली संघात मोठे फेरबदल, आता ‘हा’ खेळाडू…
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात वैभवने टॉस जिंकला आहे. बिहार संघाचे नेतृत्व करणे हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखे असल्याचे वैभव सूर्यवंशीने म्हटले आहे. इतक्या लहान वयात प्राप्त झालेली ही जबाबदारी अत्यंत अभिमानास्पद आणि भाग्याची असल्याचे वैभवने म्हटले आहे. बिहारचा युवा क्रिकेटपटू सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बिहारचे नेतृत्व करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बिहारचे नेतृत्व तो पूर्णवेळ करणार नाहीये. थोड्याच कालावधीत तो आगामी ‘रायझिंग स्टार्स आशिया कप’ निमित इंडिया ए संघाशी जोडला जाणार आहे.
आगामी ‘रायझिंग स्टार्स आशिया कप’ 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाला पाकिस्तान, नेपाळ, यूएई यांच्यासह ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मिळवलेली ही ऐतिहासिक कामगिरी कौतुकास्पद असली, तरी त्याच्या या कर्णधारपदाच्या नियुक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, वैभव सूर्यवंशीकडे सध्या म्हणावा तसा नेतृत्व करण्याचा अनुभव नसल्याचे म्हटले जात आहे. काही कालावधी आधी दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीकडे ईस्ट झोनचे उपकर्णधारपद देखील सोपविण्यात आले होते. तेव्हादेखील निवडकर्त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती.
Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला
बिहारचा संघ: वैभव सूर्यवंशी (कर्णधार), सुरज कश्यप, मयंक कुमार, परम कुमार सिंग , ऋत्विक राज, आयुष लोहारुका, अनमोल कुमार, आलोक कुमार , अल्तमश अश्रफ, वासुदेव प्रताप सिंग, आमोद यादव , हिमांशू सिंग
Ans: वैभव सूर्यवंशीला बिहारच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
Ans: क्रिकेटच्या इतिहासात सर्वात तरूण कर्णधार होण्याचा जागतिक रेकॉर्ड वैभवने केला आहे.






