Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन! मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हरवलंय? घरबसल्या ‘या’ सरकारी पोर्टलवरून मागवा डुप्लिकेट

ऑनलाइन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म सबमिट केला की दहा ते पंधरा दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी पोस्टने मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 07:47 PM
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन! (Photo Credit - X)

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन!
  • मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हरवलंय?
  • घरबसल्या ‘या’ सरकारी पोर्टलवरून मागवा डुप्लिकेट
How to Apply for a Lost Marksheet: दहावी किंवा बारावीचे गुणपत्रक (Marksheet) किंवा प्रमाणपत्र (Certificate) हरवणे ही मोठी समस्या असते. पण आता तुम्हाला बोर्डाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने ‘रिप्रिंट/डुप्लिकेट सर्टिफिकेट पोर्टल’ सुरू केले असून, याद्वारे तुम्ही तुमचे प्रमाणपत्र थेट पोस्टाने घरी मागवू शकता. सरकारने आता नवीन प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेली आहे. ऑनलाइन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म सबमिट केला की दहा ते पंधरा दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी पोस्टने मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरणायचा आहे जाणून घेवूया.

कोणती कागदपत्रे मिळू शकतात?

दहावी/बारावीचे गुणपत्रक (Duplicate Marksheet)

बोर्ड सर्टिफिकेट (Duplicate Certificate)

स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate)

तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate)

अर्ज करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत 

१. नोंदणी आणि लॉगिन:

सर्वात आधी boardmarksheet.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे व्हेरिफाय करा. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी टाकून तोही ओटीपीद्वारे व्हेरिफाईड करून ‘Next’ वर क्लिक करा.

२. वर्गाची निवड:

डॅशबोर्डवर तुम्हाला SSC (१० वी) किंवा HSC (१२ वी) असे दोन पर्याय दिसतील. तुमचे जे प्रमाणपत्र हरवले आहे, तो वर्ग निवडा. त्यानंतर ‘Fill Application Form’ या बटणावर क्लिक करा.

हे देखील वाचा: December Deadline: ३१ डिसेंबरपूर्वी उरका ‘ही’ ३ महत्त्वाची कामे; अन्यथा १ जानेवारीपासून बसणार मोठा आर्थिक फटका

३. माहिती भरणे (Application Form)

वैयक्तिक माहिती जसे तुमचे पूर्ण नाव (इंग्रजी कॅपिटलमध्ये), आईचे नाव, परीक्षा सीट नंबर (Seat Number) तसेच परीक्षेचे वर्ष आणि महिना (उदा. जे काही असेल ते) निवडा. तुमच्या शाळा किंवा कॉलेजचे नाव अचूक भरा. सध्याचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड टाका. याच पत्त्यावर तुमचे सर्टिफिकेट पोस्टाने येईल.

४. कागदपत्रे अपलोड करणे

आधार कार्डची पीडीएफ फाईल अपलोड करा. बोर्डाच्या फॉरमॅटनुसार एक प्रतिज्ञापत्र तयार करून ते पीडीएफ स्वरूपात जी साईझ असेल अपलोड करा.

५. ऑनलाईन फी भरणे:

ही सेवा मोफत नाही. साध्या अर्जासाठी अंदाजे ५०० रुपये तर तातडीच्या (Urgent) अर्जासाठी ६०० रुपये शुल्क लागते. तुम्ही UPI, QR Code, किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर मिळणारी पावती (Receipt) डाऊनलोड करून जतन करा.

किती दिवसात मिळणार प्रमाणपत्र?

तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर, साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या आत तुमचे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्ही दिलेल्या पत्त्यावर भारतीय पोस्टाद्वारे पोहोचवले जाते. तुम्ही डॅशबोर्डवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस देखील चेक करू शकता.

महत्त्वाचे मुद्दे लक्ष्यात ठेवा

माहिती भरताना स्पेलिंग आणि सीट नंबरची चूक करू नका. तसेच, प्रतिज्ञापत्राचा नमुना वेबसाईटवर उपलब्ध आहे, तोच वापरावा. सर्टिफिकेट मिळेपर्यंत ‘Application ID’ सांभाळून ठेवा.

हे देखील वाचा: Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Web Title: Have you lost your 10th or 12th mark sheet or certificate then order a duplicate copy from this government portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Career News
  • Educational News
  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
1

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था
2

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही
3

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.
4

Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.