फोटो सौजन्य - Social Media
हिमाचल प्रदेश राज्य चयना आयोगाने (Himachal Pradesh Rajya Chayan Aayaog) प्राथमिक शिक्षक पदांसाठी (JBT Teacher) भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 600 पदे उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 ऑगस्ट 2025 पासून 17 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत अधिसूचना 8 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 47 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार १२वी उत्तीर्ण असावा तसेच शिक्षणातील डिप्लोमा किंवा पदवी (JBT, D.Ed, D.El.Ed किंवा B.Ed) आणि HPTET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे एकूण वेळापत्रक 2 तासांचे असेल आणि नकारात्मक गुण (Negative Marking) नसेल. परीक्षेचा स्वरूप पुढीलप्रमाणे असेल: संबंधित विषयावर आधारित 140 प्रश्न – 70 गुण, हिमाचल प्रदेश सामान्य ज्ञान व भारतातील सामान्य ज्ञान 60 प्रश्न – 30 गुण, एकूण 200 प्रश्नांसाठी 100 गुणांची परीक्षा.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल: लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. निवड झालेल्या उमेदवारांना रु. 9300-34800 या वेतनश्रेणीत सरकारी सेवा मिळेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://hpcra.hp.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर अर्जपत्र भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सादर करावा. सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 800/- असून हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
ही भरती हिमाचल प्रदेशमध्ये सरकारी शिक्षक होण्यासाठीची एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी न गमावता लवकरात लवकर अर्ज करावा.