Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर

Airport Operations संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला विमानतळावरील विविध क्षेत्रात विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी प्रदान करेल. ज्यामुळे तुमच्या करिअरला नव्या दिशा मिळतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • विमान क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रांपैकी एक
  • विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी
  • फक्त चांगला पगारच नाही तर एक चांगलं व्यावसायिक वातावरण जीवनशैली
Airport Job : आजच्या काळात विमान क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे याक्षेत्रासोबत करिअरच्या अनेक प्रगत वाटाही खुल्या झाल्या आहेत. जर तुम्ही अशा नोकरीच्या शोधात आहात ज्यात फक्त आकर्षक पगारच नाही तर प्रगतीच्या संधी खुल्या होतील तर हे क्षेत्र तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरु शकतो. Airport Operations संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला विमानतळावरील विविध क्षेत्रात विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी प्रदान करेल. ज्यामुळे तुमच्या करिअरला नव्या दिशा मिळतील. हा अभ्यासक्रम तुम्हाला ‘ग्राउंड स्टाफ ऑपरेशन्स’, ‘कॅबिन क्रू सेवा’ आणि ‘ग्राहक सेवा’ यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सक्षम बनवेल.
विमानतळावरील नोकरीमुळे फक्त चांगला पगारच मिळणार नाही तर एक चांगलं व्यावसायिक वातावरण सुसंस्कृत जीवनशैली आणि प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर पोहोचण्यासाठी संधी देतं. त्यामुळे या उत्कृष्ट संधी मिळवून देणारे असे कोणते विभाग आहेत जाणून घेऊयात.

Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती; मिळणार ‘इतका’ पगार

ग्राऊंड स्टाफ

हे विमानतळावर प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘ग्राउंड स्टाफ’ तैनात असतात. प्रवाशांचे चेक-इन नीट करण्यासाठी, बोर्डिंग पासेस देण्यासाठी आणि प्रवाशांना संबंधित सर्व आवश्यक माहिती पुरवण्यासाठी ते कार्यरत असतात. जर एखाद्या प्रवाशाला विमानाची वेळ, गेट क्रमांक किंवा इतर कोणत्याही तपशीलांविषयी माहिती हवी असल्यास, ते ग्राउंड स्टाफशी संपर्क साधू शकतात.

केबिन क्रू

केबिन क्रूचे सदस्य विमानाच्या आत काम करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायक प्रवासावर विशेष लक्ष देतात. विमान उड्डाण करण्यापूर्वी, ते प्रवाशांना प्रवासाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती सांगतात जेणे करुन प्रवासात कोणतीही अडचण येऊ नयेत. याव्यतिरिक्त, प्रवासादरम्यान ते प्रवाशांना जेवणासह इतर आवश्यक गोष्टींची काळजी घेतात.

एयरपोर्ट ऑपरेशन स्टाफ

एयरपोर्ट ऑपरेशन स्टाफचं काम विमानतळाचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने चाललं आहे की नाही याबाबत खात्री करणं हे आहे ते विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगचं व्यवस्थित नियोजन करतात आणि त्याच वेळी सर्व प्रक्रिया सुरक्षित आणि संरक्षित पद्धतीने पार पाडल्या जातील याची खात्री करतात.

सिक्योरिटी स्टाफ

विमानतळावर उपस्थित असलेले सिक्योरिटी स्टाफ म्हणजेच सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवतात. प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्याचंही ते काम करतात. जेणेकरून विमानात अशा कोणत्याही वस्तू नेल्या जाणार नाहीत ज्यामुळे इतर प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारे सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्याकडे असते.

टेक्निकल जॉब्स

टेक्निकल जॉब्स म्हणजेच तांत्रिक भूमिकांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित कामे हाताळणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जातो. विशेषतः, इंजीनियर आणि एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकारी यांचा यात समावेश असतो. इंजीनियर विमानांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी जबाबदार असतात, ज्यामुळे विमानांची सुरक्षितता नीट राहते आणि त्याच्याकडे विशेष लक्ष दिला जातो. तर, एटीसी अधिकारी उड्डाण करत असलेल्या विमानांना कंट्रोल करतात आणि त्यांच्या टेक आणि लँडिंगसाठी मदत करतात.

विमानतळावर नोकरी कशी मिळवावी?

विमानतळावर नोकरी मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. विमान कंपन्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नोकरी संबंधित माहिती जाहीर करतात. रिक्त जागांचा आकडा जाहिरात ते आपल्या वेबसाइटवर जाहीर करत असतात. या सगळ्यात उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि मुलाखत व प्रशिक्षण कालावधीनंतर त्यांची औपचारिकपणे नियुक्ती केली जाते. सरकारी पदांसाठी, विमानतळ प्राधिकरणाद्वारे आयोजित परीक्षा आणि मुलाखतींद्वारे भरती केली जाते. याव्यतिरिक्त,थर्ड पार्टी एजन्सी अनेकदा ग्राउंड स्टाफसारख्या पदांसाठी कॉन्ट्रैक्ट पद्धतीने भरती करतात, तर सुरक्षा भूमिकांसाठी सामान्यतः SSC द्वारे आयोजित केलेल्या परीक्षांसारख्या सरकारी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

काय असले शैक्षणिक पात्रता?

विमानतळावर नोकरी मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांचा शैक्षणिक स्ट्रीम कोणतीही असोत १२ वी किंवा पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विमान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचा असतो. अशा अभ्यासक्रमांमध्ये ‘डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी’, ‘एअरपोर्ट मॅनेजमेंट’ किंवा ‘ग्राउंड स्टाफ सर्व्हिसेस’ यांचा समावेश असतो. शिवाय, या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्त्वाच्या स्कील्स असणं आवश्यक आहे. यात उत्तम संवाद कौशल्ये, आत्मविश्वास आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, ‘ग्राउंड स्टाफ’ पदावर काम करण्यासाठी किमान पात्रता ही १२ वी पास असणे किंवा पदवीधर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर संगणकाचं मूलभूत ज्ञान आवश्यक असते. ‘केबिन क्रू’च्या भूमिकांसाठी, उमेदवारांनी १२ वी किंवा पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावं; त्यासोबतच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, उत्कृष्ट संवाद कौशल्ये आणि चांगले व्यक्तिमत्त्व असणे गरजेचे आहे. तांत्रिक पदांसाठी अभियांत्रिकीची पदवी आवश्यक असते, तर ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ (ATC) क्षेत्रातील करिअरसाठी B.Sc. किंवा B.Tech. पदवी असणे आणि संबंधित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

किती मिळतो पगार?

विमानतळावरील वेतन हे प्रामुख्याने कामाच्या अनुभवाच्या पातळीवर अवलंबून असतं. ‘ग्राउंड स्टाफ’ सदस्यांना साधारणपणे ₹२०,००० ते ₹४०,०००; ‘केबिन क्रू’ सदस्यांना ₹२५,००० ते ₹१,००,०००; आणि ‘ऑपरेशन्स स्टाफ’ला ₹३०,००० ते ₹६०,००० इतका पगार मिळण्याची अपेक्षा असते. त्याच वेळी, ‘एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स’ना (ATC) ₹४०,००० ते ₹१.५ लाख या श्रेणीतील वेतन मिळू शकतं.

10th Pass Govt Jobs : दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती

Web Title: How to get job at airport salary aviation qualification marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • airport
  • Career
  • career guide
  • Career News
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती; मिळणार ‘इतका’ पगार
1

Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती; मिळणार ‘इतका’ पगार

10th Pass Govt Jobs : दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती
2

10th Pass Govt Jobs : दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती

Bank Of Baroda Recruitment 2026: आता 45 व्या वर्षातही मिळणार सरकारी नोकरी, 100+ रिक्त जागा; पगारा ते पात्रता तपशील
3

Bank Of Baroda Recruitment 2026: आता 45 व्या वर्षातही मिळणार सरकारी नोकरी, 100+ रिक्त जागा; पगारा ते पात्रता तपशील

Copywriting मध्ये करायचं आहे Career? ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात! घडवाल उज्वल भविष्य
4

Copywriting मध्ये करायचं आहे Career? ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात! घडवाल उज्वल भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.