भारतीय हवाई दलातील नोकरीच्या अर्जासाठी शेवटची तारीख (फोटो सौजन्य - (agnipathvayu.cdac.in)
आज म्हणजेच ४ ऑगस्ट २०२५ हा भारतीय हवाई दलात (IAF) नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी शेवटची संधी आहे. अग्निवीर वायु भरती २०२५ साठी नोंदणी आज रात्री ११ वाजता बंद होईल. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती चार वर्षांच्या सेवा कालावधीसाठी आहे, ज्या अंतर्गत तरुणांना उत्तम पगार, भत्ते, प्रशिक्षण आणि भविष्यात इतर सरकारी नोकऱ्यांसाठी संधी मिळतात.
तुम्हालाही ही संधी दवडायची नसेल तर आजच्या आज तुम्ही नोंदणी करून घ्या आणि भारतीय हवाई दलामध्ये नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करा. ही नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असून याची इत्यंभूत माहिती आम्ही देत आहोत. तुम्ही अजूनपर्यंत अर्ज केला नसेल तर आजचा दिवस शेवटचा आहे.
प्रश्न १: अग्निवीर वायु भरती २०२५ साठी अर्ज कसा करायचा?
प्रश्न २: या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. विज्ञानेतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून ५०% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांसाठी ही देशाची सेवा करण्याची उत्तम संधी आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के आहेत त्यांनादेखील ही नोकरी मिळू शकते. त्यामुळे असे विद्यार्थीदेखील अर्ज करून IAF मध्ये काम करण्याची संधी मिळवू शकतात.
भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली
प्रश्न ३: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: उमेदवाराचे वय १७.५ ते २१ वर्षांच्या दरम्यान असावे.
प्रश्न ४: निवड प्रक्रिया काय असेल?
प्रश्न ५: पगार आणि सुविधा किती असतील?
सुरूवातीलाच ३० हजार रूपये ही नक्कीच मोठी रक्कम आहे. त्यामुळे ज्यांचे एअरफोर्समध्ये नोकरी करण्याचे स्वप्नं आहे त्यांनी आपली वयोमर्यादा आणि शिक्षण या सर्वाचा आढावा घेऊन आजच नोकरीसाठी अर्ज करावा. आम्ही तुम्हाला इथे या लेखासह अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक देत आहोत, तुम्ही त्यावरूनही नोंदणी करून घेऊ शकता – नोंदणी करण्यासाठी थेट लिंक
MPTRANSCO भरती 2025 : शेवटची संधी, 600 हून अधिक पदांसाठी अर्ज सुरु!