फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वायुसेनेत ‘अग्निवीर वायु’ पदासाठी भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै होती. मात्र उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन ही अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्जासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्यासाठी शुल्क 550 रुपये असून, ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 12वी विज्ञान शाखेतून (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Course) केलेले उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांचा जन्म 3 जुलै 2005 ते 3 जानेवारी 2008 या कालावधीत झालेला असावा. म्हणजेच 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंतचे युवक या संधीसाठी पात्र आहेत. वयोमर्यादेच्या अटी तपासूनच अर्ज करणे गरजेचे आहे.
भरती प्रक्रिया कशी होणार?
अग्निवीर भरती ही एकूण चार टप्प्यांत पार पडणार आहे:
देशासाठी सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता तयारीला लागावं आणि अधिकृत वेबसाईटवरून अर्ज दाखल करावा. महत्त्वाचं म्हणजे, या पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांची सेवा कालावधी चार वर्षांचा असेल. त्यांना दरमहा वेतन आणि सेवेनंतर ‘सेवा निधी पॅकेज’ देखील दिलं जाईल.
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. अग्निवीर योजनेअंतर्गत देशाच्या संरक्षणात योगदान देण्यासोबतच, उमेदवारांना शिस्त, प्रशिक्षण आणि भविष्यासाठी विविध संधी मिळणार आहेत.
महत्वाच्या तारखा :