Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: ‘तुला काहीच येत नाही’ म्हणणाऱ्यांना कसं दिलं उत्तर? अनु कुमारी यांची संघर्षमयी यशोगाथा एकदा वाचाच..

Success Story:UPSC मध्ये दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनु कुमारी यांची प्रेरणादायी गोष्ट. मुलापासून २ वर्षे दूर राहून आणि अपमान सहन करून त्यांनी मिळवले यश. वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 10:03 AM
IAS Anu Kumari Success Story

IAS Anu Kumari Success Story

Follow Us
Follow Us:

IAS Anu Kumari Success Story: स्वप्न तेच पूर्ण करतात जे लोकांना शब्दांनी नाही तर कष्टाने उत्तर देतात. आपल्या आयुष्यात असे अनेकदा प्रसंग येतात. जेव्हा लोक आपल्या इच्छाशक्तीवर वार करण्याचा प्रयत्न करतात. असाच अनुभव अनु कुमारीला आला. जेव्हा त्या एका ठिकाणी शंकांचे निरसन करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना एका कोचिंग क्लासच्या संचालकाने सुनावले की, तुला एवढेही माहिती नसेल तर तुझे सिलेक्शन होईल हे विसरून जा. मात्र या टिकेने त्या खचून न जाता त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली आणि आयएएस बनून त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कुटुंब

अनु कुमारी या हरीयाणातील सोनीपतच्या रहिवासी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. आयएमटी नागपूर येथून ‘फायनान्स आणि मार्केटिंग’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्य़ा संभाळत त्यांनी युपीएससीच्या तयारीस सुरुवात केली. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावे, याकरिता त्यांनी २ वर्ष आपल्या मुलापासून दूर राहिल्या. पहिल्या प्रयत्नात एका गुणाने अपयशी झालेल्या अनु कुमारी यांनी हार न मानता पुन्हा अभ्यास सुरु केला.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

२०१७ मध्ये मिळवला भारतातून दुसरा क्रमांक

एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, मुख्य परीक्षेच्या १०-१५ दिवस पूर्वी त्या काही शंकांचे निरसन करण्यासाठी एका कोचिंग क्लासकडे गेल्या, तेव्हा कोचिंग क्लास (AIR 2) मालकाने त्यांना ऐकवले की “तुला एवढेही येत नसेल तर तुझे सिलेक्शन होईल हे विसरुन जा”. मात्र त्यांनी धैर्याने अभ्यासात सातत्य ठेवले. २०१७ मध्ये त्यांनी संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवून लोकांच्या टिकेला उत्तर दिले. ताज्या माहितीनुसार, त्या केरळमधील तिरूवनंतपुरम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?

योग्य रणनीती मिळवून देते यश

अनु कुमारी त्यांच्या अभ्यासात अत्यंत शिस्तप्रिय होत्या. तयारीच्या काळात त्या दररोज सुमारे १० ते १२ तास अभ्यास करायच्या. सकाळी लवकर उठून त्या मॉर्निंग वॉकच्या वेळी ‘ऑल इंडिया रेडिओ’ ऐकायच्या आणि जेवताना राज्यसभा टीव्ही पाहायच्या. त्या म्हणतात की, यूपीएससीच्या परीक्षेत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य रणनीतीच यश मिळवून देते.

Web Title: Ias anu kumari success story upsc topper struggle inspiring journey marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.