Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IGNOU PhD Admission 2026: इग्नूमध्ये ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; या’ विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीची सुवर्णसंधी!

IGNOU PhD Application Form 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश सुरू. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फी आणि महत्त्वाच्या तारखा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 04:56 PM
इग्नू

इग्नू

Follow Us
Follow Us:

IGNOU PhD: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२६ च्या सत्रासाठी पीएचडी (PhD) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. विद्यापीठाने आपल्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर अर्ज प्रक्रिया खुली केली असून, विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

इग्नू या सत्रात एकूण ३६ विषयांमध्ये पीएचडी प्रवेशाची संधी देत आहे. यामध्ये मानसशास्त्र (Psychology), मानववंशशास्त्र (Anthropology), राज्यशास्त्र (Political Science), लोकप्रशासन (Public Administration), बायोकेमिस्ट्री (Biochemistry), रसायनशास्त्र (Chemistry) यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत संशोधन (Research) करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, ही प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) २०२२ च्या नियमांनुसार आयोजित केली जाईल. या अंतर्गत उमेदवारांना वेगवेगळ्या श्रेणींनुसार प्रवेश मिळवता येईल.

‘या’ ४ श्रेणींनुसार करता येईल अर्ज

पीएचडी प्रवेशासाठी उमेदवार चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात:
१. यूजीसी-नेट (UGC-NET) उत्तीर्ण आणि जेआरएफ (JRF) प्राप्त उमेदवार.
२. असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्र असलेले यूजीसी-नेट उमेदवार.
३. केवळ पीएचडी प्रवेशासाठी पात्र असणारे यूजीसी-नेट उमेदवार.
४. विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या (Entrance Exam) माध्यमातून अर्ज करणारे उमेदवार.

कोणाला मिळणार थेट मुलाखतीची (Direct Interview) संधी?

इग्नूच्या नियमांनुसार, सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून मुलाखत किंवा ‘व्हायव्हा-व्हॉसी’ (Viva-Voce) देणे अनिवार्य असेल. मात्र, ज्या उमेदवारांनी आधीच जेआरएफ (JRF) किंवा यूजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना विद्यापीठाची लेखी प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. अशा उमेदवारांना थेट मुलाखतीच्या टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, हा पीएचडी कार्यक्रम फुल-टाइम (Full-Time) आणि पार्ट-टाइम (Part-Time) दोन्ही स्वरूपात उपलब्ध असेल. यामुळे नोकरी करणारे किंवा इतर कामांत व्यस्त असणाऱ्या उमेदवारांनाही त्यांचे संशोधन कार्य पूर्ण करता येईल.

‘कोर्स वर्क’ आणि उपस्थितीचे नियम

निवड झालेल्या उमेदवारांना इग्नूच्या (IGNOU) नवी दिल्ली येथील मुख्य मुख्यालयात जाऊन निर्धारित ‘कोर्स वर्क’ (Course Work) पूर्ण करावे लागेल. विद्यापीठाने हे देखील स्पष्ट केले आहे की, संशोधक विद्यार्थ्यांना कोर्स वर्क दरम्यान किमान ८० टक्के उपस्थिती (Attendance) राखणे बंधनकारक असेल. आवश्यक उपस्थिती पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

NDA Cadets Salary Details: एनडीए ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना किती पगार मिळतो? पहा एका क्लिकवर…

अर्ज कसा आणि किती फी भरावी लागेल?

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. उमेदवारांना सर्वप्रथम इग्नूच्या प्रवेश पोर्टलवर जाऊन नोंदणी (Registration) करावी लागेल. त्यानंतर अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि २,००० रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

Web Title: Ignou phd admission 2026 july session online eligibility marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • education
  • Phd

संबंधित बातम्या

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!
1

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….
2

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
3

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
4

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.