फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NDA Cadets Stipend: भारतीय सेना (Army), नौसेना (Navy) किंवा वायुसेनेत (Air Force) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारे तरुण एनडीए (NDA) करतात. येथे उमेदवारांना यूपीएससीची कठीण परीक्षा एसएसबी, मुलाखत, मेडिकल टेस्ट पास करावी लागते.
तथापि, एनडीए तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की, ट्रेंनिंग दरम्यान त्यांना पगार दिला मिळतो का? तर याचे उत्तर थोडे वेगळे आहे. एनडीएमध्ये शिक्षण आणि सुरवातीच्या ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स ना पगार मिळत नाही. परंतु, सरकार त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन एक निश्चत स्टायपेंड प्रदान करते. सातव्या वेतनाच्या शिफारशीनुसार, जेव्हा कॅडेट्स आपली ट्रेनिंग पूर्ण करून इंडियन मिलिट्री अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी किंवा इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये प्री- कमिशन ट्रेनिंगसाठी पोहचतात. तेव्हा त्यांना दरमहा ५६,१०० रुपये स्टायपेंड दिला जातो. ही रक्कम डिफेन्स पे मॅट्रेक्सच्या ‘लेव्हल-१०’ (Level-10) अंतर्गत येते. जी सैन्यातील नवीन अधिकाऱ्याच्या सुरुवातीच्या वेतनाइतकी असते. याच कारणामुळे एनडीए हा सर्वात आकर्षक पर्यायापैकी एक पर्याय आहे.
जरी स्टायपेंड ५६,१०० रुपये निश्चत असला तरी ही संपूर्ण रक्कम कॅडेटच्या बँक खात्यात जमा होत नाही. थोडक्यात, त्यांच्याकडे इन हँड १०,००० ते १५,००० रुपये उरतात. ही रक्कम काही आवश्यक आणि अनिवार्य कपातीशिवाय असते. यामध्ये युनिफॉर्म, लाँड्री, हेअरकट, क्रीडा साहित्य आणि इतर आवश्यक सुविधांसाठीही काही रक्कम खर्च होते. या सर्व कपाती लष्करी जीवनाच्या गरजांचा भाग असतो. त्यामुळे यासाठीही काही शुल्क कपात केली जाते. हातात येणारा १०,००० ते १५,००० हजार पगार कमी वाटू शकतो. पण ट्रेनिंंग दरम्यान राहणे, खाणे, वैद्यकीय उपचार आणि इतर बहुतांश सुविधा सरकारद्वारे पुरवल्या जातात, त्यामुळे कॅडेटना खूपच कमी खर्च खिशातून करावा लागतो.
प्री कमिशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना लष्करात अधिकृतपणे पद मिळते आणि ते अधिकारी बनतात. यानंतर त्यांना बेसिक पे सोबत, मिलिटरी सर्व्हिस पे (MSP), महागाई भत्ता (DA), वाहतूक भत्ता (TA) आणि इतर सुविधा मिळतात. विविध भत्ते मिळून एका नवीन अधिकाऱ्याचे मासिक उत्पन्न सहज १ लाखापेक्षा जास्त होते. पुढे अनुभवानुसारही या पगारात वाढ होते.






