Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Online Courses: जेईई परीक्षेविना आयआयटीमध्ये प्रवेश! घरबसल्या ‘हे’ लोकप्रिय ऑनलाईन कोर्सेस करण्याची सुवर्णसंधी

IIT Online Courses Without JEE: जेईई परीक्षा न देताही देशातील नामांकित आयआयटी (IIT) संस्थांमधून ऑनलाईन कोर्सेस करता येणे शक्य आहे. प्रोग्रामिंग, ई-व्हेईकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग कोर्सेसची सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 16, 2026 | 10:58 AM
online course

online course

Follow Us
Follow Us:

IIT Online Courses Without JEE: ‘आयआयटी’चे नाव ऐकताच सर्वात आधी ‘जेईई’ (JEE) परीक्षा आणि तिथली कठीण प्रवेश प्रक्रिया लोकांच्या डोळ्यांसमोर येते. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की, देशातील अनेक आयआयटी संस्था असे काही ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देतात, जे जेईई परीक्षा न देताही करता येतात. यामध्ये तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), प्रोग्रामिंग, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग, बिझनेस ॲनालिटिक्स आणि एरोस्पेस यांसारख्या अनेक लोकप्रिय विषयांचा समावेश आहे.

या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थी, नोकरी करणारे लोक आणि कौशल्य वाढवण्यास उत्सुक असलेले प्रोफेशनल्स घरबसल्या नवीन तंत्रज्ञान शिकू शकतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की, घरबसल्या तुम्ही आयआयटीमधून कोणते कोर्सेस करू शकता.

प्रोग्रामिंग आणि क्लाउड कम्प्युटिंगचे कोर्सेस

कोडिंग शिकू इच्छिणाऱ्यांसाठी आयआयटी कानपूरचा ‘प्रोग्रामिंग इन सी’ (Programming in C) हा कोर्स एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये सी प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमची मूलभूत माहिती दिली जाते. तसेच, आयआयटी खडगपूरचा क्लाउड कम्प्युटिंग कोर्स क्लाउड आर्किटेक्चर, डिप्लोयमेंट मॉडेल आणि क्लाउड सर्व्हिसेसची समज विकसित करतो. याव्यतिरिक्त सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरिअल्स यांसारखे कोर्सेसही उपलब्ध आहेत.

Sonam Wangchuk Protest: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक मैदानात; वाचा त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

बिझनेस ॲनालिटिक्स आणि आर (R) प्रोग्रामिंग

आयआयटी रुड़कीचा (IIT Roorkee) ‘बिझनेस ॲनालिटिक्स अँड डेटा मायनिंग मॉडेलिंग युझिंग आर’ हा कोर्स बिझनेस आणि डेटा ॲनालिटिक्समध्ये रस असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये ‘आर प्रोग्रामिंग’च्या साहाय्याने डेटा मायनिंग आणि ॲनालिटिक्सचे तंत्र शिकवले जाते, ज्याला सध्या इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल आणि एरोस्पेस कोर्सेस

इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रात रस असलेले विद्यार्थी ‘इलेक्ट्रिक व्हेईकल पार्ट-१’ या कोर्सच्या माध्यमातून ई-व्हेईकल तंत्रज्ञान, डिझाईन आणि इम्प्लीमेंटेशन शिकू शकतात. तसेच, आयआयटी बॉम्बेचा ‘इंट्रोडक्शन टू एरोस्पेस इंजिनिअरिंग’ आणि आयआयटी कानपूरचे ‘इंट्रोडक्शन टू एअरप्लेन परफॉर्मन्स’, ‘एअरक्राफ्ट स्टेबिलिटी अँड कंट्रोल’ (Aircraft Stability and Control), ‘डिझाईन ऑफ फिक्स्ड विंग अनमॅन्ड एरियल व्हेईकल’ आणि ‘यूएव्ही डिझाईन’ यांसारखे कोर्सेस एरोस्पेस क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

School Admission Scam: नवोदय-सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ? ‘या’ एका चुकीमुळे विद्यार्थी चौकशीच्या भोवऱ्यात सापडले

आयआयटी मद्रासचे कोर्सेस

आयआयटी मद्रासने एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांचा ‘बीएस डिग्री प्रोग्राम’ (BS Degree Program) सुरू केला आहे. या कोर्समध्ये विमाने, रॉकेट्स, ड्रोन, सॅटेलाईट, स्पेस टेक्नॉलॉजी आणि एअरक्राफ्ट डिझाईनशी संबंधित विषय शिकवले जातील. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थी ही पदवी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून पूर्ण करू शकतात. या कोर्समध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपचाही समावेश आहे.

Web Title: Iit online courses without jee programming data science aerospace engineering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • course
  • Degree
  • IIT
  • JEE
  • Online Classes

संबंधित बातम्या

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..
1

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..
2

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.