
Image
या पदभरतीमध्ये २ सिनियर प्रोजेक्ट असोसिएट (मानधन ₹४२,००० + HRA, वय मर्यादा ४० वर्षे), ४ प्रोजेक्ट असोसिएट-II (मानधन ₹३५,०००/२८,००० + HRA, वय मर्यादा ३५ वर्षे), १३ प्रोजेक्ट असोसिएट-I (मानधन ₹३१,०००/२५,००० + HRA, वय मर्यादा ३५ वर्षे), ३ टेक्निकल असिस्टंट (मानधन ₹२०,००० + HRA, वय मर्यादा ५० वर्षे), ३ प्रोजेक्ट असिस्टंट (मानधन ₹२०,००० + HRA, वय मर्यादा ५० वर्षे) आणि ६ फील्ड/लॅबोरेटरी असिस्टंट (मानधन ₹२०,००० + HRA, वय मर्यादा ५० वर्षे) अशा पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पुणे, चेन्नई, गुवाहाटी, दिल्ली, आसाम (तेजपूर) किंवा भोपाळ या ठिकाणी केली जाऊ शकते.
संबंधित पदांनुसार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सकाळी ०९:०० ते १०:०० वाजेदरम्यान उमेदवारांनी उपस्थित राहाणे अनिवार्य आहे. १०:०० वाजेनंतर येणाऱ्या उमेदवारांना चाचणीस बसू दिले जाणार नाही. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादेतील सूट आणि अर्जाचा नमुना याबाबतची सविस्तर माहिती IITM च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.tropmet.res.in) उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहावे.
Ans: २२ ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध पदांनुसार मुलाखती (लेखी व कौशल्य चाचणी) आयोजित केल्या आहेत.
Ans: सविस्तर माहिती आणि अर्जाच्या नमुन्यासाठी www.tropmet.res.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.