Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा; महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदनाद्वारे घातले साकडे

महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना जून २०२६ पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करून शनिवार-रविवार सुट्टी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 03:14 PM
शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा (Photo Credit- X)

शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा
  • महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदनाद्वारे घातले साकडे
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या विविध विभागांना पूर्वीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे. आता तर मध्यपूर्व देशांत युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांनी चार ते पाच दिवसांचा आठवडा शाळांना सुरू केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील देखील सर्व प्राथमिक शाळांना जूनपासून पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे.

केंद्र सरकारने त्यांच्या अंतर्गत अनेक विभागांना यापूर्वीच पाच दिवसांचा आठवडा केलेला आहे. तसाच आदेश शाळांसाठीही लागू व्हावा. शिक्षण तज्ञ, बाल मानस तज्ञ, मानसोपचार तज्ञ यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरील बोजा तसेच पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांना सुचवलेल्या आहेत. अभ्यासाचा ताण आणि पाठीवरील दप्तराचे ओझे यामुळे विद्यार्थ्यांचे बालपण कोमेजले जात असून, सुटीमुळे कुटुंबाशी मुलांचे नाते अधिक घट्ट होईल असे समितीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही शाळेच्या अध्यापनाबरोबरच बीएलओ, जनगणना, ऑनलाईन कामे व इतर शासकीय कामे करावी लागतात. अशी कामे शाळेच्या वेळेनंतर तसेच शनिवारी रविवारी असतात.

नवीन मतदार नोंदणी कॅम्प व विविध प्रशिक्षणेही शनिवारी, रविवारी होतात. विविध प्रकारची शासकीय कामे, विद्यार्थ्यांची पोर्टलवर माहिती भरणे, पडताळणी करणे, विविध विद्यार्थ्यांचा निकाल, अॅपमध्ये माहिती भरणे, शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे, परीक्षेचे फॉर्म भरणे, अशी अनेक कामे शिक्षक हे अध्यापनाच्या कामानंतर तसेच शनिवारी, रविवारी करतात. सर्व शिक्षण नियंत्रण करणाऱ्या अधिकारी यांना यापूर्वीच पाच दिवसांचा आठवडा आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ; चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!

जगातील अनेक देशात शाळांना पाच दिवसांचा आठवडा आहे. जागतिक युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांनी चार ते पाच दिवसांचा आठवडा शाळांना सुरू केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना जूनपासून पाच दिवसांचा आठवडा सुरू करावी, अशी विनंतीवजा मागणी संघटनेतर्फे दिलीप ढाकणे, प्रसाद म्हात्रे, आर. आर. जोशी, शिवाजी साखरे, रामदास सांगळे, अंकूश काळे, माधव लातुरे, अंजुम पठाण, गिरीश नाईकडे, नितीन कोळी, मुक्ता पवार, दीपा देशपांडे आदींनी केली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव, शिक्षण प्रश्न सचिव, शिक्षण आयुक्त आदींना सादर करण्यात आली आहे.

आत्महत्येचे प्रमाण कमी होईल

शिक्षणातील विविध स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अनेक पालकांना शनिवारी, रविवारी सुट्टी असते. विद्यार्थीदेखील या दिवशी घरी राहतील तर त्यांचा कुटुंबाशी जिव्हाळा वाढेल. मुलांचा अतिरिक्त अभ्यासाचा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांची पालकांशी असणारे संबंध सुधारतील. मुलांना कौटुंबिक साथ लाभेल. परिणामी विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

वीज अन् इंधनाचा खर्चही वाचेल

शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शनिवारी अर्धा दिवस सुटी असते. त्यामुळे अर्ध्या दिवसासाठी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी पूर्ण दिवस सुटी महत्त्वाची ठरेल. बालकांचे बालपण हरवले जाणार नाही. अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या शाळेतील येण्या-जाण्याच्या वाहनांचा इंधनाचा खर्च, वीजबिल आदी खर्च वाचेल, असे संघटनेने म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

Web Title: Implement a 5 day week for schools maharashtra state ideal teachers committee appeals to the state government via a memorandum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • central goverment
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!
1

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
4

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.