Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढतोय की कमी होतोय? छत्रपती संभाजीनगरातली प्रवेशसंख्या आश्चर्यकारक

छत्रपती संभाजीनगरातील मनपा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 02:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरातील शाळांमध्येही ही लगभग सुरु झाली आहे.
  • पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
  • मंगळवारी शहरातील ५० मनपा शाळांमध्ये ‘एक पाऊल पुढे’ हा उपक्रम राबविण्यात आला.
यंदाचा शैक्षणिक वर्ष संपला असून आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळांतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे. विविध शाळा जसे की शासकीय किंवा खाजगी, प्रवेशप्रक्रियेच्या कामाला सुरुवात करत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील शाळांमध्येही ही लगभग सुरु झाली आहे. छत्रपती संभाजी नगरात महापालिका शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ‘एक पाऊल पुढे’ या उपक्रमांतर्गत आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शहरातील ५० मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

Panaah Communities : पनाह कम्युनिटीजच्या प्रभावाच्‍या माध्‍यमातून सामुदायिक जागांचे शैक्षणिक केंद्रांमध्ये रूपांतर

या मोहिमेचे उद्घाटन सिडको एन-७ येथील मनपा केंद्रीय प्राथमिक शाळेत महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बुरांडे, आरोग्य सभापती डॉ. सुनीता सोळुंके आणि नगरसेविका सुरेखा सानप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून करण्यात आले. तसेच किराडपुरा, ब्रिजवाडी, सिडको एन-११, मुकुंदवाडी आदी भागांतील शाळांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया पार पडली.

छत्रपती संभाजीनगरातील महानगर पालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ प्रकल्पामुळे पालकांचा कल वाढत असून अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी दिसून आली. मागील वर्षी २० शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्यामुळे यंदा बालवाडी आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठात महामानवांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर! भीमजयंतीनिमित्त विशेष उपक्रम 

दरम्यान, लांब अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीएसआर निधीतून सायकल वाटप करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ आणि अडचणी कमी होणार आहेत. पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाही मनपा शाळांमध्ये प्रवेशाची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Is the inclination of students towards government schools increasing or decreasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Career
  • Government
  • Schools

संबंधित बातम्या

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
1

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
2

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या
3

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या

Government Pension Scheme : दरमहा फक्त 55 रुपये गुंतवा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन! सरकारची ‘ही’ भन्नाट स्कीम माहिती आहे का?
4

Government Pension Scheme : दरमहा फक्त 55 रुपये गुंतवा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन! सरकारची ‘ही’ भन्नाट स्कीम माहिती आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.