Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITI Exam: पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय; गुणपत्रिकेत होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल!

ITI Exam Result Reforms: केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने (DGT) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) गुणपत्रकात मोठा बदल केला आहे. नवीन ई-प्रमाणपत्रात 'अपार' (APAAR) आयडी आणि शैक्षणिक क्रेडिट्सचा समावेश होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 05:52 PM
ITI

ITI

Follow Us
Follow Us:

ITI Exam Result Reforms 2026: केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (डीजीटी) एक महत्त्वाचा लेखी आदेश दिला आहे, ज्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) मुख्य परीक्षा दिलेल्या प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या गुणपत्रकाच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील ‘क्राफ्टसमन ट्रेनिंग स्कीम’ अंतर्गत २०२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि पुढील महिन्यात परीक्षा देणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी हा बदल लागू करण्यात येणार आहे. त्यांच्या नवीन ई-प्रमाणपत्रात आणि निकालात हा महत्त्वाचा बदल केला जाईल. ‘आयटीआय’मध्ये अनेक अभ्यासक्रम दोन वर्ष मुदतीचे असतात. यात पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास प्रशिक्षणार्थींच्या निकालावर ‘नापास’ हा शेरा दिला जात असे नंतर हाच शेरा घेऊन प्रशिक्षणार्थी दुसऱ्या वर्षांसाठी प्रवेश घेत असत.

CBSE Exam: सीबीएसईचा मोठा निर्णय; ‘या’ वर्षापासून उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी थेट ऑनलाईन मिळणार!

मुख्य परीक्षेच्या गुणपत्रिकेत बदल

प्रशिक्षणार्थीचे त्याच्या ट्रेडनुसार ५०, १०० आणि २५० गुणांचे वेगवेगळे पेपर होतात. यातील २५० मार्कांसाठी प्रशिक्षणार्थींने प्रात्यक्षिक करणे गरजेचे आहे. तसेच त्याने लेखी पेपरमध्ये ३३ टक्के गुण तर प्रात्यक्षिकांसाठी ६० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. तसेच आयटीआयमध्ये अभ्यासक्रम पूर्णे केल्यानंतर प्रशिक्षणार्थी उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी (ऑन जॉब ट्रेनिंग) जातात. आता या प्रशिक्षणाच्या मिळणाऱ्या गुणांचा गुणपत्रकांमध्ये समावेश होतो. म्हणजेच निकालातील हा बदल केवळ मुख्य परीक्षेच्या गुणपत्रिकेपुरता असेल. पुरवणी परीक्षेसाठी पूर्वीप्रमाणेच उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा शेरा कायम असेल असे ‘डीजीटी’ने आदेशात नमूद केले आहे.

विद्यार्थींच्या  क्रेडिटचा गुणपत्रकात समावेश

आता आयटीआय प्रशिक्षणार्थींना नवीन ई स्वरूपात ‘नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट’ मिळेल. त्यात अपार क्रमांकाचा समावेश असेल. यापूर्वी असा क्रमांक गुणपत्रकांवर नव्हता तसेच अपार आयडीनुसार संबंधित विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थीने त्याच्या शैक्षणिक काळात मिळवलेले क्रेडिटचा या गुणपत्रकात समावेश केला जाईल. हे क्रेडिट प्रशिक्षणार्थीला ‘अॅकॅडमी बँक ऑफ क्रेडिट’मध्ये दिसू शकतील. या बातमीमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील लाखो प्रशिक्षणार्थींसाठी एक दिलासा मिळाला आहे.

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

Web Title: Iti exam result reforms new e certificate apaar id academic bank of credits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • central goverment
  • education
  • Exam

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.