Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI startup founder: वयाच्या १४ व्या वर्षी बुर्ज खलिफावर ऑफिस? कोण आहे भारतीय वंशाचा AI स्टार्टअप फाउंडर जैनम जैन?

Jainam Jain AI startup founder: भारतीय वंशाच्या १४ वर्षांच्या जैनम जैनने दुबईतील बुर्ज खलिफाच्या १४१ व्या मजल्यावर आपल्या 'Mango Engine' या AI स्टार्टअपचे ऑफिस सुरू केले आहे. वाचा त्याची प्रेरणादायी यशोगाथा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 01, 2026 | 09:34 AM
ted

ted

Follow Us
Follow Us:

Jainam Jain AI startup founder: ज्या वयात बहुतांश मुले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या करिअरबद्दल विचार करू लागतात, त्याच वयात भारतीय वंशाच्या जैनम जैन याने स्वतःचा एआय (AI) स्टार्टअप सुरू केला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या जैनमने दुबईतील प्रतिष्ठित बुर्ज खलिफाच्या १४१ व्या मजल्यावर आपल्या कंपनीचे कार्यालय स्थापन केले आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, तो दुबईतील सर्वात तरुण एआय स्टार्टअपचा संस्थापक मानला जातो.

‘मँगो इंजिन’ प्लॅटफॉर्मची स्थापना

जैनम जैन हा ‘मँगो इंजिन’ (Mango Engine) नावाच्या एआय प्लॅटफॉर्मचा संस्थापक आहे. हा प्लॅटफॉर्म कंपन्यांना मार्केटिंग, सेल्स, ग्राहक संवाद, लीड मॅनेजमेंट आणि कंटेंट क्रिएशन यांसारखी अनेक कामे स्वयंचलितरित्या करण्यास मदत करतो. सध्या हा प्लॅटफॉर्म बीटा स्टेजमध्ये (चाचणी टप्प्यात) आहे, तरीही अनेक कंपन्या याचा वापर करण्यासाठी उत्सुक आहेत. कंपन्यांना कमी वेळेत अधिक प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी हा प्लॅटफॉर्म व्यवसायांसाठी एक ‘एआय को-फाउंडर’ म्हणून विकसित करण्याचे जैनमचे ध्येय आहे.

अवघ्या सहाव्या वर्षी मिळाली उद्योजकतेची पहिली दीक्षा

जैनमने दिलेल्या माहितीनुसार, त्याला उद्योजकतेचा पहिला धडा वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मिळाला. त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा एका बिझनेस मीटिंगला सोबत नेले होते. तिथूनच त्याची बिझनेस आणि स्टार्टअपच्या जगाविषयीची उत्सुकता वाढली. त्याने स्वतःला केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, विविध बिझनेस इव्हेंट्समध्ये भाग घेतला, अनेक उद्योजकांची भेट घेतली आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यास सुरुवात केली. हाच सुरुवातीचा अनुभव पुढे जाऊन त्याच्या स्टार्टअपचा पाया ठरला.

Chennai Colleges Co-Education: १०० वर्षापूर्वीची परंपरा बदलली! ‘या’ मुलांच्या कॉलेजचे दरवाजे आता मुलींसाठीही उघडले

पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळा मार्ग का निवडला?

जैनमने पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा एक वेगळा मार्ग निवडला. आपल्या स्टार्टअपला आणि नवनवीन बिझनेस आयडियांना अधिक वेळ देता यावा, यासाठी त्याने वयाच्या १३ व्या वर्षी अवघ्या १०५ दिवसांत इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित नसून ते प्रत्यक्ष अनुभव, लोकांशी साधलेला संवाद आणि नवीन आव्हाने हे शिकण्यात म्हत्त्वाचे आहे, असे मत जैनमचे आहे.

बहुआयामी कामगिरी आणि अफाट यश

जैनमची कामगिरी केवळ एआय स्टार्टअपपुरती मर्यादित नाही. तो एक ‘TEDx’ स्पीकर आहे, त्याच्या नावावर दोन पेटंट नोंदवले गेले असून इतर अनेक पेटंट्सची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय त्याने एक पुस्तकही लिहिले असून, यूट्यूबवर (YouTube) त्याची १.४५ लाखांपेक्षा जास्त सब्सक्राइबर्सची कम्युनिटी आहे.

वयाच्या १० व्या वर्षापासून त्याने स्वतःला “५०-डे चॅलेंज” (50-Day Challenge) देण्याची सवय लावून घेतली होती. या अंतर्गत त्याने ५० पुस्तके वाचली, ५० नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये भाग घेतला आणि भारतातील यशस्वी उद्योजकांना भेटण्यासाठी सुमारे ६,००० किलोमीटरचा प्रवास केला.

Sripati Civil Judge: मुलीच्या जन्मानंतर अवघ्या २ दिवसांत दिली परीक्षा; २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून श्रीपतीने रचला इतिहास!

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश

जैनम जैनची ही कथा सिद्ध करते की, यश हे केवळ वय किंवा पदवीवर अवलंबून नसते. जर तुमच्याकडे शिकण्याची जिद्द, कठोर परिश्रम आणि मोठे ध्येय गाठण्याची आवड असेल, तर कमी वयातही मोठी शिखरे सर करता येतात. जागतिक स्तरावर प्रभाव पाडणारी एक ‘युनिकॉर्न कंपनी’ उभारण्याचे जैनमचे स्वप्न आहे. शिक्षणासोबतच व्यावहारिक अनुभव, नेटवर्किंग आणि नवीन तंत्रज्ञान शिकणे हे देखील भविष्यातील यशाचा भक्कम पाया ठरू शकते, असा मोलाचा संदेश जैनमची ही यशोगाथा तरुण आणि विद्यार्थ्यांना देते.

Web Title: Jainam jain 14 year old dubai youngest ai startup founder mango engine success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • ai
  • Business
  • Dubai
  • starts

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
2

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ
3

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य
4

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.