Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story:14 व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं, शेतात राबली अन्… इल्मा अफरोज यांची IPS अधिकारी बनण्याची कहाणी

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी या छोट्याशा गावातून न्यूयॉर्कच्या उत्तुंग इमारतींपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा वाटतो. पण इल्मा अफरोजसाठी हा प्रवास संघर्षमयी होता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 03:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • इल्मा अफरोजसाठी हा प्रवास संघर्षमयी
  • १४ व्या वर्षी वडिलांचं निधन
  • आईने केला स्वतःच्या सुखाचा त्याग
Success Story, Ilma Afroz IPS: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी या छोट्याशा गावातून न्यूयॉर्कच्या उत्तुंग इमारतींपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा वाटतो. पण इल्मा अफरोजसाठी हा प्रवास संघर्षमयी होता. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं. आपल्या मातीबद्दल आणि ज्या मुलांकडे शिक्षणाची साधनं नाहीत, अशा गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा इल्माच्या मनात होती. या सगळ्या संघर्षातून त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या आईचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. चला तर मग जाणून घेऊयात हा प्रेरणादायी प्रवास.

DRDO इंटर्नशिपची संधी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी 30 हजार स्टायपेंडसह अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

१४ व्या वर्षी वडिलांचं निधन

मुरादाबादमधील कुंदरकी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात इल्मा अफरोजचा जन्म झाला. वडिलांनी तिला साधेपणा आणि कष्टाचे धडे दिले याच्याच बळावर ती मोठी होत होती. पण जेव्हा इल्मा फक्त १४ वर्षांची होती, तेव्हा वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि १२ वर्षांचा मुलगा आणि इल्मा यांच्या दोघांच्या संगोपनाची जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली. त्या काळात इल्माने शेतात राबून कष्ट केलं. या सगळ्या संघर्षांवेळी कोणी त्या अधिकारी लेकीची कल्पनाही केली नसणार पण ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं.

आईने केला स्वतःच्या सुखाचा त्याग

सुरुवातीचा प्रवास शेतात पण नंतर उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं सोपं नव्हतं. या सगळ्या मागे होता तो त्या आईचा खंबीर पाठिंबा आणि तिचा संघर्ष. समाजातील जुन्या रूढी आणि संकुचित विचारांना बाजूला सारून इल्माच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला. ज्या समाजात मुलींच्या लग्नासाठी हुंड्याचे पैसे जमा केले जातात, तिथे इल्माच्या आईने आणि त्यांच्या लहान भावाने स्वतःच्या सुखाचा त्याग केला. त्यांनी आपली सर्व पुंजी आणि संसाधनं इल्माच्या उच्च शिक्षणावर खर्च केली. इल्मा आजही आपल्या आईला जगातील सर्वात धाडसी महिला मानते.

भारतात परतण्याचा मोठा निर्णय

इल्माच्या बुद्धिमत्तेने तिला दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तिची निवड ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ मध्ये झाली, जिथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणांनंतर ती न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनमध्ये गेली. तिथे तिचं जीवन निवांत आणि आलिशान होतं. पण मॅनहट्टनची स्कायलाईन पाहताना तिला नेहमी गांधीजींचा तो संकल्प आठवायचातिला जाणवलं की, त्यांच्या शिक्षणाचा खरा फायदा आपल्या देशातील लोकांनाच झाला पाहिजे. त्यानंतर तिने परदेशातील सुख सोडून भारतात परतण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि स्वदेशींचं भलं करण्यासाठी ती भारतात परतली.

‘होप’ नावाचं नेटवर्क

२०१७ मध्ये इल्मा अफरोजने यूपीएससी परीक्षेत २१७ वा रैंक मिळवला आणि IPS साठी निवड झाली. हिमाचल प्रदेश केडर मिळालं, परंतु तिचं ध्येय केवळ गुन्हेगारांना पकडणं नव्हतं. इल्माने आपल्या कुंदरकी गावात ‘होप’ (Hope) नावाचं नेटवर्क सुरू केलं आहे,. हे नेटवर्क वंचित आणि गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतं. वडिलांचं कॅन्सरमुळे निधन होण्यापासून आणि शेतात काम करण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आणि आजही ती प्रेरणा तरुणांच्या मनात जिवंत ठेवण्याचं काम त्या होपच्या माध्यमातून करत आहेत.

Exclusive Series : एक मुलगा, एक बदल आणि लिंग समभावाची जाणीव: मीना राजू मंचमुळे आदित्य बिलार्डचा प्रेरणादायी प्रवास

Web Title: Jobs success story of ips ilma afroz who crecked upsc in 2017 stuggle life journey see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • Career News
  • Marathi News

संबंधित बातम्या

केम छो? ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार गुजराती कुटुंबाची सून; साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली की, आम्ही….
1

केम छो? ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार गुजराती कुटुंबाची सून; साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली की, आम्ही….

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Trade Deal: मोठी बातमी! India – New Zealand मैत्रीचा नवा टप्पा! 70% भारतीय मालावर आता Tax नाही, कोणाला होणार फायदा?
3

Trade Deal: मोठी बातमी! India – New Zealand मैत्रीचा नवा टप्पा! 70% भारतीय मालावर आता Tax नाही, कोणाला होणार फायदा?

पांढरा टी-शर्ट, काळा गॉगल, ‘Peddi’ च्या सेटवर Ram Charan ची नवी झलक, बुच्ची बाबू सना यांच्यासोबत हटके अंदाजात…
4

पांढरा टी-शर्ट, काळा गॉगल, ‘Peddi’ च्या सेटवर Ram Charan ची नवी झलक, बुच्ची बाबू सना यांच्यासोबत हटके अंदाजात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.