अंतिम तारीख
अधिकृत संकेतस्थळावर नोटीस जारी करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
कुठे आणि किती जागा?
मेकॅनिकल इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 2 जागा | DIBER, हल्द्वानी – 1 जागा
कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 1 जागा
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 1 जागा | DIBER, हल्द्वानी – 1 जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: DIBER, हल्द्वानी – 2 जागा
स्टायपेंड किती
निवड झालेल्या उमेदवारांना एकूण 30,000 रुपये स्टायपेंड मिळेल. बी.ई./बीटेक आणि एम.ई./एमटेक अंतिम वर्षातील विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी पात्र आहेत. हा प्रोग्राम हल्द्वानी येथील DIBER आणि दिल्लीतील DIPAS संस्थांसाठी सुरू करण्यात आला आहे. किमान 15 दिवस सक्रिय सहभाग आवश्यक आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल.
या इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असून 1 जुलै 2026 पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पहिल्या 3 महिन्यांनंतर – 15,000 रुपये
पुढील 3 महिन्यांनंतर – 15,000 रुपये
अर्ज कसा करावा?
DRDO च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्जातील सर्व माहिती कॅपिटल लेटर्समध्ये भरावी.
आवश्यक कागदपत्रे:
कॉलेज आयडी
आधार कार्ड
मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
कॉलेजची शिक्कामोर्तब व प्राचार्यांची सही
पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
‘डायरेक्टर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी अँड अलाइड सायन्सेस (DIPAS), DRDO, संरक्षण मंत्रालय, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली – 110054’
जिप शाळेची ‘इस्रो’ पर्यंत भरारी! स्पर्धा जिल्हास्तरीय परीक्षेत संपादन केले घवघवीत यश
Ans: BE/BTech आणि ME/MTech अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र आहेत.
Ans: एकूण 30,000 रुपये स्टायपेंड मिळेल.
Ans: अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे.






