Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

कोल्हापूरातील राजू बजबळकर या मुलाने तीस वर्ष अथक प्रयत्न करुन आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात त्याची निवड केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 19, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड
Follow Us
Close
Follow Us:
  • बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले
  • जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड
कोल्हापूर/ विनोद मोहिते : ईश्वरपूर, कष्ट, जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला तर यश नक्कीच पदरात पडते. हे सिध्द करून दाखवले आहे ते ईश्वरपूर येथील संग्राम राजेंद्र बजबळकर या तरुणाने. गेली तीस वर्ष पहाटे घरोघरी वृत्तपत्र टाकणारे आणि कचेरी चौकात चहाची टपरी चालवणारे राजेंद्र उर्फ ‘राजू चहावाला’ यांचा मुलगा संग्राम याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची परीक्षा उत्तीर्ण करून यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

कचेरी चौकातील राजूची चहाची टपरी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसह राजकीय मंडळींसाठीही ‘चाय पे चर्चा’चे हक्काचे ठिकाण राहिली आहे. मात्र आयुष्याने राजू बजबळकर यांच्यावर कठोर परीक्षा घेतली. लहानपणी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.

अल्पशिक्षण, आर्थिक अडचणी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे असूनही त्यांनी हार मानली नाही. पडेल ते काम करत अखेर वृत्तपत्र टाकण्याचा व्यवसाय स्वीकारला. या प्रवासात पत्नीनेही त्यांना खंबीर साथ दिली. आई-वडिलांचे कष्ट सतत डोळ्यासमोर ठेवत एकुलत्या एक असणाऱ्या संग्रामने १२ वी नंतर लष्करात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

तीन वर्षे सातत्याने प्रयत्न केले. मात्र तीन वेळा अपयश आले. तरीही अपयशाने खचून न जाता त्याने अभ्यास सुरूच ठेवला. सांगोला येथील एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, पण आर्थिक परिस्थितीमुळे ती सोडावी लागली. त्यानंतर युट्यूबवरील ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून घरीच, व घराशेजारील दत्त टेकडी परिसरात फिजिकलचा सराव व अभ्यास सुरू ठेवला.

आवश्यक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण

फेब्रुवारी २५ मध्ये त्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची लेखी परीक्षा दिली. त्यानंतर शारीरिक व वैद्यकीय चाचणीसह सर्व आवश्यक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. अखेर त्याची निवड जाहीर झाली. औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो सेवेत रुजू होणार आहे. याच क्षेत्रात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याचा निर्धार संग्रामने व्यक्त केला आहे.

“आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास केला. शासकीय नोकरीत लागून त्यांच्या कष्टाला पूर्ण न्याय द्यायचा हाच हेतू होता, असे सांगताना संग्राम भावूक झाला. गेली तीन दशके राजेंद्र बजबळकर हे रोज पहाटे पाच वाजता वृत्तपत्र टाकतात. दिवसभर उभे राहून लोकांना चहा देत सेवा करतात.

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

निकाल जाहीर झाल्यानंतर आज संग्राम आणि त्याचे मित्र चहाच्या टपरीवर आले, राजेंद्र यांना मिठी मारली आणि अभिनंदन केले, त्या क्षणी राजूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले, “कष्टाची चीज झाली, पोरगं मोठं झालं,” असे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडताच उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

आजदिवसभर अनेक जण राजू बजबळकरांना गुलाल का लावला असे विचारत होते तेव्हा त्यांना मुलगा नेमका कोणत्या पदावर गेला? हे ही माहीत नव्हते. त्यावर साध्या शब्दांत ते सांगत होते. “साहेब झाला सरकारी नोकरीत गेला परीक्षा पास झाला.” पदाची नेमकी माहिती नसली तरी मुलाच्या यशाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात संग्राम देशातील महत्त्वाच्या उद्योग, विमानतळे, मेट्रो, अणुऊर्जा प्रकल्प, बंदरे, राष्ट्रपती भवन, सर्व मंत्रालये, सरकारी कार्यालये याची सुरक्षा करण्याचे काम करेल.

REET साठी करताय अर्ज? पहिला भरतीच्या रीतीभाती जाणून घ्या; इतका पगार मिळतो

Web Title: Kolhapur news kolhapur news sangram bajbalkar selected in central industrial security force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Educational News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य
1

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप
2

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील
3

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.