Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ३,१४७ जणांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

महाराष्ट्रातील कृषी अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेची पहिली CAP यादी जाहीर झाली आहे. १८,९९३ विद्यार्थ्यांपैकी १०,८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून ३,१४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे पहिले महाविद्यालय मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 08:21 PM
agriculture student

agriculture student

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कृषी शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान,बी.एस्सी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून या पहिल्या यादीत १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ९७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये ३ हजार १४७ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

३ हजार १४७ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

राज्यात कृषी अभ्यासक्रमासाठी ३ हजार १४७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून त्यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले असून या विद्यार्थ्याना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या सी कॅप व संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल.

राज्यात कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बनले CA ! भारतीय वंशाच्या तरुण विद्यार्थ्याने कसे मिळवले यश जाणून घ्या एका क्लिकवर..

विद्यापीठनिहाय जागावाटप

राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या १० हजार ८७१ प्रवेशाचे जागावाटप विद्यापीठनिहाय पाहिले असता पहिल्या फेरीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला ४७०० जागांचे वाटप झाले आहे. तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला २९६८ जागांचे वाटप झाले आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला २४६९ जागांचे वाटप झाले आहे. व दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला ७३४ जागांचे वाटप झाले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. यानंतर २० ऑगस्टला दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर करण्यात येणार आहेत.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखेमध्ये हे चार वर्षाचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यात २०१ कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १७ हजार ९७६ आहे.

FSSAI New Rules: शाळेत मुलांना मिळणाऱ्या जेवणात होणार ‘हे’ मोठे बदल; FSSAI ने आणले कडक नियम!

अभ्यासक्रमनिहाय पहिल्या फेरीतील जागावाटप

  • बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी — ७,८७८
  • बी.टेक. अन्न तंत्रज्ञान — ८६२
  • बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या — ५५९
  • बी.टेक. जैवतंत्रज्ञान — ५५३
  • बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन — ४९५
  • बी.टेक. कृषी अभियांत्रिकी — ४१४
  • बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या — ५३
  • बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान — ३३
  • बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान — २४

Web Title: Maharashtra agriculture admission first cap round 2026 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • agriculture
  • Career News

संबंधित बातम्या

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
1

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
3

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
4

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.