Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Maharashtra Board Exams 2027: MSBSHSE ने 2027 साठी १० वी आणि १२वी च्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोणत्या तारखेपासून सुरू होणार परीक्षा जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2026 | 11:06 AM
10वी - 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा (फोटो सौजन्य-ChatGPT)

10वी - 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • १० वी आणि १२ वी च्या परिक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र मंडळाने केले जाहीर 
  • कोणत्या तारखेपासून सुरू होणार परीक्षा 
  • कसे असणार वेळापत्रक 
Maharashtra Board Exams 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ साली होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, १२वी ची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर १०वी ची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि अभ्यासाचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी मंडळाने या तारखा जाहीर केल्या आहेत.

राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये परीक्षा घेण्यात येतील.

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा

राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे. #SSCExam #HSCExam #BoardExam #MaharashtraBoard #MSBSHSE pic.twitter.com/aSJjol3LyV — Navarashtra (@navarashtra) September 18, 2026

इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होईल, तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील.

बोर्डानुसार, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या तयारीचे नियोजन करण्यास मदत व्हावी आणि विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा मानसिक ताण कमी व्हावा, यासाठी परीक्षेच्या तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या आहेत.

विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक आणि अधिकृत सूचना

तसंच, विषयनिहाय परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. प्रात्यक्षिके, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, तसेच लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. मंडळाच्या अधिकृत अधिसूचनेनुसारच हे वेळापत्रक असून विद्यार्थ्यांना आता व्यवस्थित तयारी करता येईल. 

विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही मोठा दिलासा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक तणावाशिवाय आपल्या अभ्यासाचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास आणि वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होईल.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध व्हायचे असले तरी, या प्राथमिक वेळापत्रकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची रणनीती आखण्यासाठी पुरेशी स्पष्टता दिली आहे. सर्व उमेदवारांना आता अंतिम आणि अधिकृत वेळापत्रकासाठी केवळ मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरच अवलंबून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र कधीपासून परीक्षा सुरू होणार याचा अंदाज देण्यात आला आहे. 

Web Title: Maharashtra board exams 2027 10th 12th timetable dates released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Career News
  • education news
  • maharashtra board
  • Maharashtra Board Exam

संबंधित बातम्या

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!
1

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.