फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाचा माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागावे असे आवाहन करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात -येणार आहे. दरवर्षीप्रमाणेच या वेळेसही परीक्षा दोन सत्रांत म्हणजेच दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायं ६ या वेळेत असेल.
बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक
बारावीच्या बोर्ड परीक्षांना १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होईल. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असेल. तर शेवटचा पेपर समाजशास्त्र (Sociology) या विषयाचा ११ मार्च २०२६ रोजी होईल. या कालावधीत विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे सर्व विषय अनुक्रमे घेतले जातील.
दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक
दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ रोजी पहिल्या भाषेच्या पेपरपासून सुरू होतील. तर शेवटचा पेपर समाजशास्त्र पेपर २ (भूगोल) विषयाचा १८ मार्च २०२६ रोजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयानुसार तारीख, वेळ आणि पेपरच्या शिफ्टची माहिती अधिकृत वेळापत्रकातून मिळेल.
परीक्षा केंद्रावरील नियम
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र (Admit Card) सोबत नेणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ठरलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचून आपली उपस्थिती नोंदवावी.
वेळापत्रक डाउनलोड करण्याची पद्धत
विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात:
राज्य मंडळाने वेळापत्रक आगाऊ जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यास नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या वेळेचा योग्य उपयोग करून आपल्या तयारीला अंतिम स्वरूप द्यावे.






