
Maharashtra CET 2027: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
परंतू सरकारने डिसेंबरचा पेपर घेणार नाही असं जाहीर केलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याकडून आलेल्या माहितीनुसार, परीक्षा दोनदा होणार हा निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही परीक्षा बारावीनंतर होतात. सीईटी सेलने ही या गोष्टीला समर्थन दिले आहे. Maharashtra CET 2027:
2026-27 पासून सरकारने सीईटी परीक्षा दोनवेळा घेण्यास सुरुवात केली. याचा फायदा असा की मुलांना परीक्षा देण्याची दोनदा संधी मिळते. दोन पेपरपैकी ज्यात जास्त मार्क पडतील तेच मार्क प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. पहिल्यावर्षी हा निर्णय थोडा उशिरा घेण्यात आल्याने दोन्ही पेपर हे एप्रिल आणि मे महिन्यात घ्यावे लागले. मात्र पुढच्या वर्षी 2027-28 साठी वेगळा विचार सुरु आहे. पहिली सीईटी डिसेंबर 2026 ला आणि दुसरी एप्रिल 2027 ला घ्यायची असं सीईटी कक्षाने ठरवली आहे कारण जेईई पण अशाच पद्धतीने दोन सेशनमध्ये होते, त्यामुळे सीईटी सुद्धा दोन सेशनमध्ये घेण्याचा विचार सुरु आहे.
डिसेंबरच्या पेपरला गावाकडच्या भागातून जोरदार विरोध झाला. धाराशिव, नंदुरबार, चंद्रपूर इथल्या पालकांनी आणि क्लास चालवणाऱ्या शिक्षकांनी सरकारला पत्र लिहित म्हणाले की, हा निर्णय मुंबई-पुण्यातल्या मोठ्या क्लासेसचा विचार करुन घेण्यात आला.
गावाकडे जेईई देणाऱ्या मुलांची संख्या फार कमी असते, दरम्यान बारावीचा अभ्यासक्रम डिसेंबरपर्यंत पूर्ण होत नाही. अशावेळी मुलांवर दबाब येईल. अजून अभ्यासच झाला नाही तर पेपर कसा देणार? हा आमच्या मुलांवर अन्याय आहे, असं पालकांचे म्हणणं आहे.
या सगळ्या तक्रारी आल्यानंतर सरकारने शिक्षण तज्ज्ञांचे मत मागवले. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर डिसेंबरची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापुढे दोन्ही सीईटी बारावीच्या परीक्षेनंतरच होईल. एक परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये आणि दुसरी एप्रिल-मे मध्ये घेतली जाईल. दोन्ही पेपरमध्ये साधारण एक महिन्याचं अंतर ठेवलं जाईल. दोन्हीपैकी जास्त मार्क असलेला पेपर ग्राह्य धरला जाईल हा नियम तसाच ठेवण्याच आला आहे. विद्यार्थ्यांनी आधी बोर्डची परीक्षा शांत डोक्याने द्यावी आणि त्यानंतर सीईटीच्या परीक्षेची तयारी करावी.