
स्टेनोग्राफी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!
राज्यातील इन्स्टट्यूटचे मालक, त्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक आणि हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरीची संधी कायमची गेली आहे. खासगी कंपन्या, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, विविध न्यायालयांमध्ये सर्वसामान्यांना कुटुंबातील मुले आणि मुलींना स्टेनोच्या माध्यमातून हमखास रोजीरोटी मिळत आली आहे. सरकारच्या निर्णयामुळे लघुलिपीच्या माध्यमातून मिळविलेले कौशल्य आणि त्यासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. पाल्यांना नोकरीच्या आशेने शिक्षण शिकविणारे पालकसुद्धा या निर्णयाने संकटात सापडले आहेत.
Perfume ची आवड आहे? Doctor – Engineer सोडा आता ‘या’ हटके क्षेत्रात बनवा Career ; पगाराचा आकडा ऐकलात…
हा कोर्स शिकण्यासाठी साडेतीन वर्षे लागतात. ग्रामीण भागीतील मुलं पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्टेनो, टापपींग शिकतात. मिनिटाला ६०, ८०, १०० आणि १२० शब्दांच्या गतीने या परीक्षा होतात. बुद्धी विकसित करणारी अत्यंत अवघड अशी ही लिपी आहे. ती अवगत करणे हे एक कौशल्य आहे. परंतु, आता स्टेनो हे पदच सरकारने मृत घोषित केले आहे. या पाठोपाठ आता ही लिपीसुद्धा मृत होईल, अशी भीती वाटते.
पिटमन शॉर्टहैंड या ब्रिटिश विद्वानाने १८३७ मध्ये या लिपीचा शोध लावला. या लिपीचा जगभरात प्रसार झाला आहे. सध्या विविध देशांमध्ये ती आवर्जून शिकवली जात असताना, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने स्टेनोग्राफरची पदभरती काही विभागात मृत करणे, हा एकप्रकारे लिपी बंद करण्यासारखाच प्रकार आहे. राज्यात चार हजारांवर टायपिंग अॅड शॉर्टहैंड इन्स्टिट्यूट आहेत. या संस्थांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने एमपीएसीमार्फत काही विभागात भरती केली जाणारी लघुलेखकाची पदे मृत घोषित केली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय अनाकलनीय असून यासंदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देता घेतल्या या निर्णयाने अनेक विद्याथ्यांची संधी हिरावली आहे. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी संधी देण्याची अर्थात अल्टिमेटम देण्याची गरज होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटणार आहे.