फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी १२ वीच्या बोर्डाचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. यावर विद्यार्थी आपला रोल नंबर (सीट नंबर) सबमिट करून पाहू शकतील. आज एकाच वेळी अनेक विद्यार्थी आपला रिजल्ट पाहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुख्य वेबसाईटवर ट्राफिक वाढते. अशावेळी विद्यार्थी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करू शकतात.
स्टेप १: डिजीलॉकर किंवा digilocker.gov.in वेबसाइट ओपन करा
स्टेप २: आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ‘Sign Up’ किंवा नोंदणी करा
स्टेप ३: मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा.
स्टेप ४: आधीच अकाउंट असल्यार लॉगिन करा.
स्टेप ५: होमपेजवर ‘Issued Documents’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Class XII Marksheet’ वर क्लिक करा.
स्टेप ६: आता सर्च बारमध्ये जाऊन ‘Maharashtra Board’ पर्याय निवडा.
स्टेप ७: ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ८: आता तुमची माहिती (रोल नंबर आणि परीक्षेचे वर्ष) अचूक भरा .
स्टेप ९: आता तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
स्टेप १०: ती मार्कशीट सेव्ह करा आणि प्रिंट काढून घ्या.






