Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Job Alert : महाविद्यालयांमध्ये मोठी भरती जाहीर, प्राध्यापकांसह ग्रंथपाल, पीटी डायरेक्टर पदेही भरली जाणार !

राज्यातील विविध विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. प्राध्यापकांसह ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 02:54 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी
  • परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढलं
  • या तारखेला पदं भरली जाणार 
Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी  आनंदाची बातमी आहे. सगळे वाट पाहत असलेली मेगाभरती लवकरच केली जाणार आहे.  राज्यातील विविध विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. प्राध्यापकांसह ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढले आहे. नेमकी कधी होणार ही मेगा भरती?

MHT CET Exam Date 2026: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या परीक्षेच्या बदललेल्या तारखा

विद्यापीठांना सूचना

राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सप्टेंबर २०२५ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आता ही भरती प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, त्यासंदर्भात विद्यापीठांना सूचना दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांना दिली.

कामकाजाला फटका बसतोय

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यापीठे, महाविद्यालयांच्या कामकाजाला फटका बसत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची मागणी राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी अनेकदा केली आहे, त्यासाठी आंदोलनेही होत आहेत. प्राध्यापक भरतीच्या तारखांबाबत विचारण्यात आल्यावर ‘तारीख पे तारीख’ दिली जात होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक, तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे,” असे पाटील यांनी सांगितले.

या तारखेला पदं भरली जाणार

राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे साडेपाच हजार पदे पुढील काळात भरली जाणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित ही पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयनिहाय पदांचा तपशील कळविण्यात आला आहे. परिणामी आता महाविद्यालयाकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणे अपेक्षित आहे.

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या जनगणनेत! १६ मेपासून जनगणना प्रारंभ; शिक्षकांमध्ये नाराजी

Web Title: Major recruitment announced in collegespositions for librarians and pt directors to be filled alongside professors news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Career News
  • education
  • job news
  • Jobs Recruitment
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!
1

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
3

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
4

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.