Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Entrepreneur : अवघ्या १२ व्या वर्षी मुलीने सुरू केला ‘AI’ स्टार्टअप; जगभरातील कंपन्याना पुरवतीये आज ‘ही’ सेवा

12-Year-Old AI Entrepreneur Manna Jampala: अवघ्या १२ वर्षांची मना जमपाला (Manna Jampala) हिने 'Voxa' नावाचा एआय (AI) स्टार्टअप सुरू केला आहे. कॅनडा, भारत आणि कंबोडियामधील अनेक व्यवसाय तिची ही सेवा वापरत आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 13, 2026 | 05:36 PM
ai startup

ai startup

Follow Us
Follow Us:

12-Year-Old AI Entrepreneur Manna Jampala: ज्या वयात मुलांचे लक्ष फक्त खेळण्या-बागडण्यावर असते, त्या वयात एका मुलीने एआय (AI) शिकून अशी कामगिरी करून दाखवली आहे, ज्याचा कोणी त्या वयात विचारही करू शकत नाही. शाळा आणि आपले छंद जोपासण्यात व्यस्त राहण्याच्या वयात, मना जमपाला (Manna Jampala) हिने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप उभा केला आहे आणि त्याद्वारे अनेक कंपन्या चालवल्या जात आहेत. अवघ्या १२ व्या वर्षी ही अद्भूत कामगिरी करणारी मना ही ब्रिटिश कोलंबियामधील केलोना (Kelowna) येथे राहणारी आहे. ती सध्या ७ वी इयत्तेत शिकत असून ‘वोक्सा’ या स्टार्टअपची संस्थापिका आहे. ‘Voxa’ हे एक एआय-पावर्ड रिसेप्शनिस्ट आहे, जे व्यवसायांचे कस्टमर कॉल्स २४ तास आणि ७ दिवस व्यवस्थापित करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया की मना जमपाला हिने अवघ्या १२ व्या वर्षी ही किमया कशी करून दाखवली?

सर्वात तरुण एआय (AI) उद्योजकांपैकी एक

१२ वर्षांच्या मना जमपाला हिला तिच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या एका समस्येवरून प्रेरणा मिळाली. तिने वास्तविक जीवनातील या आव्हानाला एका नाविन्यपूर्ण एआय सोल्युशनमध्ये बदलले. मना हिने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी ‘पायथन’ (Python) भाषा शिकली आणि कोडिंगबद्दल माहिती मिळवल्यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी तिने एआय प्रॉडक्ट्स (AI Products) बनवण्यास सुरुवात केली. यानंतर तिने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. तिचा हा प्रवास तिला जगातील सर्वात तरुण एआय उद्योजकांपैकी एक बनवतो.

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

‘Voxa’ ची कल्पना कशी सुचली?

मनाला ‘Voxa’ ची कल्पना तेव्हा सुचली, जेव्हा तिने तिच्या वडिलांच्या व्यवसायात एक गोष्ट पाहिली. तिथे इतर ग्राहकांना अटेंड करत असताना कर्मचारी अनेकदा येणारे फोन कॉल्स मिस करायचे. सतत कॉल मिस होण्याच्या या समस्येचे निवारण करण्यासाठी तिने एक असा एआय व्हॉईस असिस्टंट (AI Voice Assistant) तयार केला, जो केवळ फोन कॉल्सची उत्तरेच देत नाही, तर अपॉइंटमेंट्स शेड्युल करू शकतो, रेस्टॉरंटचे ऑर्डर्स घेऊ शकतो, फॉलो-अप मेसेजेस पाठवू शकतो आणि कॉलचा संपूर्ण सारांश देखील तयार करू शकतो.

Goverment Recruitment 2026: कोणत्याही परीक्षेविना सरकारी संस्थेत करिअर सुरू करा! एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘असा’ अर्ज करा

अनेक देशांमध्ये केला जातोय वापर

‘वोक्सा’चा (Voxa) वापर सध्या कॅनडा, भारत आणि कंबोडियामधील व्यवसायांद्वारे केला जात आहे. ही प्रणाली सेवा-आधारित व्यवसायांसाठी २४/७ एआय व्हॉईस असिस्टंट तयार करते. याद्वारे कंपन्यांना मिस्ड कॉल्स, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि सेवेमध्ये येणारे अडथळे कमी करण्यास मदत होते. सध्या ही कंपनी रेस्टॉरंट्स, फार्मसी यांसारख्या इतर सेवा क्षेत्रांशी जोडली गेली आहे आणि कॅनडामध्ये पूर्णपणे पायलट प्रोजेक्ट्स तसेच लाईव्ह डिप्लॉयमेंटवर काम करत आहे. मना जमपाला हिचा हा शोध अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरू शकतो.

Web Title: Manna jampala 12 year old ai entrepreneur voxa startup python coding success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • ai
  • America
  • Business
  • founded
  • starts

संबंधित बातम्या

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
1

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..
2

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?
3

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?

Lindsay Clancy Case: 3 मुलांची हत्या आणि मानसिक आजाराचा वाद; पाहा काय आहे पोस्टपार्टम सायकोसिस? ज्यामुळे अमेरिकेत खळबळ
4

Lindsay Clancy Case: 3 मुलांची हत्या आणि मानसिक आजाराचा वाद; पाहा काय आहे पोस्टपार्टम सायकोसिस? ज्यामुळे अमेरिकेत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.